बाळापूर हद्दीत महिन्यात १२ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:17 AM2018-07-03T00:17:23+5:302018-07-03T00:17:38+5:30
पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवळ जून महिन्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील तिघांनी विषारी औषध पिवून, तिघांनी गळफास घेवून तर एकाने जाळून घेवून स्वत:चे जीवन संपविले आहे. एकाच महिन्यात जीवन संपविणाऱ्यांची संख्या पाहिल्यानंतर ‘मरण स्वस्त झाले आहे’, अशी चर्चा रंगू लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवळ जून महिन्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील तिघांनी विषारी औषध पिवून, तिघांनी गळफास घेवून तर एकाने जाळून घेवून स्वत:चे जीवन संपविले आहे. एकाच महिन्यात जीवन संपविणाऱ्यांची संख्या पाहिल्यानंतर ‘मरण स्वस्त झाले आहे’, अशी चर्चा रंगू लागली आहे.
आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवळ जून महिन्यांत १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये विशाल प्रकाश ठोके (डोंगरकडा, दारूच्या नशेत गळफास घेतला), लोपमुद्रा विलास कल्याणकर (देवजना, गळफास), सुभाष लक्ष्मण कडेगाव (रूद्रवाडी, दारू पिवून बेशुद्ध पडून मयत), नारायण संभाजी काळेवार (जवळा पांचाळ, विद्युत पोल अंगावर पडल्याने मयत), आनंदराव बळवंतराव पोले (डोंगरकडा फाटा- छातीत दुखत असल्याने मृत्यू), श्राजू बबनराव शिखरे (येडशी, विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू), लिंंबाराव कान्हाजी अरी (वारंगाफाटा येथे दीर्घ आजाराने मृत्यू), निकिता तुकाराम हिंगाडे (घोडा, जाळून घेवून मृत्यू), धोंडबाराव भगवानराव पतंगे (गोर्लेगाव, विषारी औषध प्राशन मृत्यू) कविता अशोक मगर (सिंदगी, इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू), बाळू सुभाष डुकरे (गुंडलवाडी, गळफास घेवून मृत्यू), कैलास तुकाराम खरोडे (जामगव्हाण, विषारी औषध पिवून मृत्यू) असा एकूण १२ जणांचा मृत्यू झाला.
दारूच्या नशेत गळफास व विषारी औषध प्राशन केल्याने मयत झालेल्यांची संख्या अधिक आहे. एकाच महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेल्यांची संख्या पाहता जगण्यासाठी संघर्ष करण्याऐवजी मरणाला जवळ करण्याची मानसिकता वाढली आहे. त्यामुळे ‘मरण स्वस्त होत आहे’, अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे. ताणतणावाच्या या जगात आनंदही जीवन जगण्यासाठी गावागावात समुपदेशन करायला हवे, असाही स्वर ऐकावयास मिळत आहे.