२७ तलावांत १२ टक्केच जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:46 PM2018-03-10T23:46:52+5:302018-03-10T23:46:58+5:30
जिल्ह्यात यंदा काही अल्प तर काही भागात अत्यल्प पर्जन्यमान झाले. धरणांतही जेमतेम तीन ते चार टक्के पाणी असून भूगर्भ पाणीपातळीही खालावत आहे. लघुपाटबंधारेच्या २७ तलावांचा उपयुक्त जलसाठाही आता १२ टक्क्यांवर आला आहे. विविध भागात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असताना प्रशासन मात्र केवळ आराखडे व सर्व्हे करण्यातच गुंतलेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात यंदा काही अल्प तर काही भागात अत्यल्प पर्जन्यमान झाले. धरणांतही जेमतेम तीन ते चार टक्के पाणी असून भूगर्भ पाणीपातळीही खालावत आहे. लघुपाटबंधारेच्या २७ तलावांचा उपयुक्त जलसाठाही आता १२ टक्क्यांवर आला आहे. विविध भागात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असताना प्रशासन मात्र केवळ आराखडे व सर्व्हे करण्यातच गुंतलेले आहे.
हिंगोली जिल्ह्याला लागून असलेल्या इसापूर, येलदरी व सिद्धेश्वर या तिन्ही धरणांची पाणीपातळी यंदा अत्यल्प आहे. यात येलदरी धरणात जीवंत साठा ३६.४९ दलघमी असून याची एकूण क्षमतेशी टक्केवारी ४.४९ आहे. सिद्धेश्वर धरणात २0.६५ दलघमी असून साठवणक्षमतेशी हे प्रमाण २५.५0 टक्के आहे. तर इसापूर धरणात जीवंतसाठा ३६.३५ दलघमी असून हे प्रमाण ३.७७ टक्के एवढे आहे.
तर लघुपाबंधारेच्या तलावांपैकी हिंगोलीतील चोरजवळा-२२ टक्के, सवड-२९, पेडगाव-९, हातगाव-१, भाटेगाव -१ टक्के जलसाठा आहे. सेनगाव तालुक्यातील सवना-२२, पिंपरी-८, घोडदरी-५३ टक्के जलसाठा आहे. औंढा तालुक्यातील मरसूळ-२0, वाळकी-३६, सुरेगाव२९, पुरजळ-३, वंजारवाडी-३३, पिंपळदरी-२६ तर केळीत ३ टक्के जलसाठा आहे. कळमनुरी तालुक्यातील बोथी ४९ टक्के, दांडेगाव-३८, तर वसमत तालुक्यातील राजवाडी तलावात ५0 टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पांची क्षमता ५४ दलघमीची असून पाणीसाठा मात्र ६.५६ दलामीच आहे.
टंचाई वाढू लागली
सध्या ग्रामीण भागातून टंचाईची ओरड होत आहे. मात्र तरीही प्रशासनाने आतापर्यंत केवळ दोन ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत. इतरांचे बेहाल आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या २७ तलावांतही अवघा दोन टक्के पाणीसाठा उरला आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील पारोळा, वडद, हिरडी, सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव, औंढा तालुक्यातील सेंदूरसना, केळी, कळमनुरी व देवधरी या तलावांचे पाणी जोत्याखाली गेले आहे.
२७ लघुप्रकल्पांपैकी ९ जोत्याच्या खाली गेले. १४ प्रकल्पांत 0 ते २५ टक्के, २ प्रकल्पांत ५0 टक्क्यांच्या आत, तर उर्वरित दोन प्रकल्पांत त्यापेक्षा जास्त पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवसांत २२.९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.
कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयांतही अल्पसाठा आहे. यात सेनगावात चिंचखेडा बंधाºयात 0.६१, हिंगोलीत खेर्डा बंधाºयात-0.५९, जिंतूरवच्या खोलगाडगा बंधाºयात 0.६१ व परभणीच्या रहाटीत १.२ दलघमी पाणी आहे.