आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी १२ प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:54 AM2018-08-29T00:54:38+5:302018-08-29T00:54:57+5:30
दरवर्षी शासनाकडून दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार नियमप्रमाणे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी वाटपाच्या सूचना आहेत. तालुका स्तरावरून जिल्हा कार्यालयाकडे १२ प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दरवर्षी शासनाकडून दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार नियमप्रमाणे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी वाटपाच्या सूचना आहेत. तालुका स्तरावरून जिल्हा कार्यालयाकडे १२ प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
राज्य शासनाकडून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाºया शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने पुरस्कार वितरित करून शिक्षकांचा सन्मान केला जातो. हिंगोली जिल्ह्यातील तालुका स्तरावरून संबधित गटशिक्षणाधिकाºयांनी जिल्हा कार्यालयात एकूण १२ शिक्षकांचे प्रस्ताव दाखल केले आहेत. निवड समितीमार्फत सदर प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे पाठविण्यात येणार आहेत. मान्यता मिळताच संबधित शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आदर्श पिढी घडविणाºया शिक्षकांचा शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी सन्मान करून त्यांना पुरस्कार देण्याचे नियोजन आहे. शासनाच्या तशा सूचनाही आहेत. परंतु वेळेत पुरस्कार प्राप्त होत नाहीत. त्यामुळे पुढील प्रक्रिया रेंगाळते. दरवर्षी ही अशीच बोंब आहे. शिक्षणाधिकाºयांकडून संबधित तालुक्याच्या गशिअंंना वेळोवेळी याबाबत लेखी सूचना दिल्या जातात. मात्र प्रस्ताव दाखलास विलंब होतो. परिणामी, ५ सप्टेंबरऐवजी अन्य दिवशीच हे पुरस्कार वितरित करण्यात येतात. गतवर्षी जिल्ह्यातील ६ जणांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
शिक्षक दिन अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही शिक्षण विभागाकडून अद्याप प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आले नाहीत हे विशेष. संबधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांना आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तालुक्यातील शिक्षकांचे प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. २४ आॅगस्ट प्रस्ताव दाखल करण्याची शेवटची तारीख होती.