३० गावांतील १२८ जण ग्रा.प. निवडणूकीसाठी अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:39 AM2020-12-30T04:39:31+5:302020-12-30T04:39:31+5:30

औंढा नागनाथ : तालुक्यात ८८ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. यापैकी ३० गावांतील उमेदवारांनी २०१५ च्या ...

128 people from 30 villages Ineligible for election | ३० गावांतील १२८ जण ग्रा.प. निवडणूकीसाठी अपात्र

३० गावांतील १२८ जण ग्रा.प. निवडणूकीसाठी अपात्र

Next

औंढा नागनाथ : तालुक्यात ८८ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. यापैकी ३० गावांतील उमेदवारांनी २०१५ च्या निवडणुकीत झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर न केल्यामुळे १२८ जणांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित केेले आहे.

औंढा नागनाथ तालुक्यात २०१५ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १२८ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. मतमोजणीनंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्चाची दैनंदिनी तहसीलदार यांच्याकडे सादर करणे बंधनकारक हाेते. असे असतानाही निवडणूक खर्च दाखल केला नाही. याव्यतिरिक्त त्यांना २०१६ मध्ये एका महिन्याची नोटीस देऊन खर्च दाखल करण्यासाठी शेवटची संधीची नोटीस देण्यात आली होती. यानंतरही त्यांनी झालेला खर्च दाखल केला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी औंढा तालुक्यातील १२८ जाणांना पाच वर्षे निवडणूक करण्यासाठी अपात्र ठरविले आहे.

यामध्ये असोला तर्फे लाख येथील अलका खंदारे, पुंजाजी कऱ्हाळे, कलावंती पुरी, रंजना कऱ्हाळे, श्रीरंग जवादे, सखुबाई बोचरे, हरिभाऊ पुरी, अंबाबाई नाईक, मीरा कऱ्हाळे, सावरखेडा येथील कौशल्या हाके, गयाबाई रुपनर, अर्चना सावंत, लिलाबाई काळे, दैवशाला रुपनर, लक्ष्मी सावंत, कांताबाई रुपनर, सावळी खुर्द येथील निवृत्ती खिल्लारे, देवी खिलारे, तेजस्विनी आघाव, जोडपिंपरी येथील सुशीला राठोड, छब्बु जाधव, कैलास पोले, भुजंगराव पोले, कमलाबाई पवार, गुलाब गुंडगे, मीनाताई पोले, केळी येथील भासू राठोड, गब्बा राठोड, हिरा राठोड, नामदेव चव्हाण, दौडगाव येथील रेणुका मगर, विश्वनाथ बेगडे, माथा येथील वैजनाथ गीने, गुंडा येथील काैशल्‍याबाई पोटे, पांगरा तर्फे लाख येथील मारुती कऱ्हाळे, पूर येथील कमलाबाई सोनवणे, माधव वानखेडे, सरस्वती वानखेडे, सुकापुर येथील गोकर्णा नाईक, बाजीराव धनवे, बेबीताई पोले, पंडित फुले, कौशल्याबाई पोले, चोंडी शहापूर येथील कुंडलिक काळे, मेघाजी चव्हाण, येडुद येथील अंजाबाई भुक्तर, काठोडा येथील संभाजी मोरे, कांताबाई मोरे, सुनील कबले, नागेशवाडी येथील दौलत नाईक, रंगराव नाईक, जयवंतराव नाईक, विठोबा नाईक, कृष्णा नाईक, सिताराम कऱ्हाळे, स्वाती नाईक, पुरभाजी सरोदे, प्रभाकर नाईक, धोंडबा नाईक, वगरवाडी येथील परबतगीर सोळंके, रख्माजी कदम, गुलाब पवार, लोहरा बुद्रुक येथील दिलीप माळवतकर, सदाशिव माळवतकर, राजेश राठोड, विठ्ठल राठोड, रामचरण राठोड, पुरभाजी राठोड, रुपूर येथील भारती पुंडगे, येळी येथील पार्वती नागरे, दतराव सांगळे, संजीवनी नागरे, सिंधू धुळे, सूर्यकांत नागरे, प्रल्हाद नागरे, अनखळी येथील संजय गडकर, सत्यभामा गारकर, शिवकुमार दराडे, कौशल्या गारकर, सुरेखा दराडे, नरेश गारकर, सुमनबाई गारकर, पोटा खुर्द येथील कमल पांचाळ, रामचंद्र शेळके, गोळेगाव येथील द्वारकाबाई वाकळे, जिजाबाई सातपुते, जिजा कऱ्हाळे, राजापूर येथील शेषराव हंडे, गोकर्णा दांडेगावकर, बोरगाव येथील शेख अजमेरा इस्माईल, पारडी सावळी येथील रुस्तुम सांगळे, पंचफुला सांगळे, जनार्धन नागरे, अमोल सांगळे, शंकर गीते, पार्वतीबाई नागरे, सुधामती नागरे, वगरवाडी तांडा येथील संगीता राठोड, लांडाळा येथील श्यामसुंदरी घारे, अंजनवाडी येथील शशिकला घनसावंत, शेषराव घनसावंत, शिवलीला घनसावंत, मथुराबाई घनसावंत, आशामती नागरे, शंकर कुठे, अविनाश गवहिरे, अनिता घुगे, अनिता गीते, अंजनवाडा येथील सुलाबाई काचगुंडे, अशोक काचगुंडे, सुनिता जवादे, प्रकाश काचगुंडे, प्रजा शिंदे, प्रल्हाद काचगुंडे, दिपाली चव्हाण, काळुबाई राठोड, लक्ष्मीबाई बलखंडे, सुलाबाई घोंगडे, वंदना घोंगडे, रूखमाबाई राठोड, संगीता राठोड, गणेश चव्हाण, पांडुरंग राठोड, परसराम राठोड, लोहारा खुर्द येथील तुकाराम वरुड या गावांतील १२८ जणांचा समावेश अपात्र यादीमध्ये करण्यात आला आहे. निवडणूक खर्च सादर न केल्याने हिंगाेली जिल्हाधिकारी यांनी ही कारवाई केेली आहे.

Web Title: 128 people from 30 villages Ineligible for election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.