हिंगीलीतील एकाच परीक्षा केंद्रावर बारावीचे १३ कॉपीबहाद्दर रस्टीकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 07:18 PM2019-03-09T19:18:09+5:302019-03-09T19:18:31+5:30

पेपर सोडविताना नक्कल करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट रस्टीकेट केले जात आहे.

13 students of HSC exam are detained | हिंगीलीतील एकाच परीक्षा केंद्रावर बारावीचे १३ कॉपीबहाद्दर रस्टीकेट

हिंगीलीतील एकाच परीक्षा केंद्रावर बारावीचे १३ कॉपीबहाद्दर रस्टीकेट

Next

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील केंद्रा बु. येथील अमृतराव पाटील परीक्षा केंद्रावरील १३ कॉपी बहाद्दरांना आज भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी रस्टीकेट केले. 

जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रावरून बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. जिल्ह्यात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून धडपड केली जात असली तरी, अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रावर सर्रासपणे कॉप्यांचा सुळसुळाट असल्याचे चित्र आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी भरारी पथकाद्वारे केंद्रांना भेटी दिल्या जात आहेत.

यावेळी पेपर सोडविताना नक्कल करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट रस्टीकेट केले जात आहे. ९ मार्च रोजी बारावी अर्थशास्त्र विषयाचा पेपर होता. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्याचे भरारी पथकाने सेनगाव तालुक्यातील केंद्रा बु. येथील एका परीक्षा केंद्रास भेट दिली असता, या ठिकाणी विद्यार्थी नक्कला करीत असल्याचे निदर्शनास आले. भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी १३ विद्यार्थ्यांना रस्टीकेट केले आहे. यापुर्वीही अनेक विद्यार्थ्यांना नक्कला करताना पकडल्याने भरारी पथकाने त्यांना रस्टीकेट केले होते.

Web Title: 13 students of HSC exam are detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.