प्रमुख विभागांत १३२४ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:09 PM2018-08-30T23:09:01+5:302018-08-30T23:09:24+5:30
जिल्ह्यात महसूल, कृषी, जि.प. व पोलीस प्रशासनातील रिक्त पदांचा आकडाच १३२४ वर जात आहे. अजूनही जागा रिक्त होतच असून इतर विभागांची स्थिती तपासली तर हा आकडा दोन हजारांवर जाण्याची शक्यता आहे. याचा कारभारावर परिणाम होत असले तरीही या मागास जिल्ह्यात कोणी अधिकारी यायला तयार नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात महसूल, कृषी, जि.प. व पोलीस प्रशासनातील रिक्त पदांचा आकडाच १३२४ वर जात आहे. अजूनही जागा रिक्त होतच असून इतर विभागांची स्थिती तपासली तर हा आकडा दोन हजारांवर जाण्याची शक्यता आहे. याचा कारभारावर परिणाम होत असले तरीही या मागास जिल्ह्यात कोणी अधिकारी यायला तयार नाहीत.
जिल्हा परिषदेत सर्वाधिक रिक्त पदांची संख्या आहे. यामध्ये वर्ग १ व २ च्या पदांचीच संख्या ८0 आहे. सामान्य प्रशासन-६, महिला व बालकल्याण-४, अर्थ-१, लघुसिंचन -१, ग्रामीण पाणीपुरवठा ७, आरोग्य-२0, पशुसंवर्धन-६, कृषी-३, शिक्षण-२७, समाजकल्याण-१, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ७ अशी वर्ग १ व २ च्या अधिकाऱ्यांची ८0 पदे रिक्त आहेत. यात समाजकल्याण, शिक्षण मा., सामान्य प्रशासन, स्वच्छता व पाणीपुरवठा, म.व बालकल्याण, जिग्रावियंला आधीच प्रमुख नसताना गटविकास अधिकाºयांचीही बोंब आहे. गट बमधील ३0४ पदे रिक्त आहेत. यात प्रशासन अधिकारी, लघुलेखक, सहायक लेखाधिकारी, कृषी अधिकारी, अभियंता, आरेखक, विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख, अराजपत्रित, उच्चश्रेणी मुख्याध्यापक व शिक्षकांचा सामवेश आहे. गट कमधील लिपिकवर्गीय तसेच आरोग, बांधकाम, कृषी, शिक्षण, यांत्रिकी आदी विभागातील तांत्रिक कर्मचाºयांसह ५७२ पदे रिक्त आहेत. तर परिचर, चौकीदार अशी वर्ग चारची १0५ पदे रिक्त आहेत.
कृषीलाही घरघर
रिक्त पदाची घरघर आणखी एक महत्त्वाचा विभाग असलेला कृषीलाही लागली आहे. या विभागात १३७ पदे रिक्त आहेत. तीन तालुका कृषी अधिकारी नाहीत. शिवाय कृषी अधिकारी, कृषीसहायक, लिपिक, अनुरेखक आदींचीही मिळून सर्व १३७ पदे रिक्त आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातही रिक्त पदांवरून बोंब सुरू आहे. झालेल्या बदल्यानंतर केवळ निवडणूक उपजिल्हाधिकारी सोडले तर पुरवठा, सामान्य, निवासी, रोहयो, भूसंपादन ही उपजिल्हाधिकारी पदे रिक्त होत आहेत. त्यामुळे नवीन अधिकारी आल्याशिवाय यांना न सोडण्याचा निर्णय जिल्हाधिकारी
अनिल भंडारी यांनी घेतला आहे. याशिवाय तहसीलदार २, नायब तहसीलदार ५, लिपिक, तलाठी, मंडळ अधिकारी अशी १0६ पदे जिल्हाभरात रिक्त आहेत. या जिल्ह्याला केवळ ५२१ पदे असून त्यापैकी ४१५ भरलेली असल्याचे चित्र आहे.
इतर विभागांप्रमाणे पोलीस यंत्रणेतही आधीच अपुरे मनुष्यबळ मंजूर असताना पोलीस निरीक्षक, सपोनि, फौजदारांची आठ पदे रिक्त आहेत. इतर मिळून रिक्त पदांचा आकडा १९ वर जातो.