१३४४ उमेदवारांनी दिली परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:59 PM2018-06-10T23:59:30+5:302018-06-10T23:59:30+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ‘क’ पूर्व परीक्षा १० जून रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत हिंगोली शहरातील ७ उपकेंद्रावर घेण्यात आली. एकूण १ हजार ७२२ उमेदवारांपैकी १३४४ जणांनी परीक्षा दिली. तर ३७७ उमेदवार परीक्षेस गैरहजर होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ‘क’ पूर्व परीक्षा १० जून रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत हिंगोली शहरातील ७ उपकेंद्रावर घेण्यात आली. एकूण १ हजार ७२२ उमेदवारांपैकी १३४४ जणांनी परीक्षा दिली. तर ३७७ उमेदवार परीक्षेस गैरहजर होते.
हिंगोली शहरातील सात उपकेंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली. यावेळी पोलीस बंदोबस्त होता. शहरातील आदर्श महाविद्यालय भाग ‘अ’ परीक्षा केंद्रावरून ३३६ पैकी २५२ जणांनी परीक्षा दिली. तर ८४ उमेदवार परीक्षेस गैरहजर राहिले. तसेच आदर्श महाविद्यालय भाग ‘ब’ केंद्रावरून ३३६ पैकी २६३ उपस्थित तर ७३ गैरहजर राहिले. सिक्रेटहार्ट इंग्लिश स्कूल केंद्रावरून २४० पैकी १९१ जणांनी परीक्षा दिली. तर ४९ गैरहजर होते. जिल्हा परिषद बहुविध प्रशाला केंद्र १९२ पैकी १५३ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर ३९ गैरहजर होते. शिवाजी महाविद्यालय केंद्रावरून १९२ पैकी १५४ उपस्थित तर ३८ जण गैरहजर होते.
जिल्हा परिषद कन्या शाळा केंद्रावरून १६८ पैकी १३४ जणांनी परीक्षा दिली. तर ३४ गैरहजर राहिले. सरजूदेवी भिकूलाल भारूका आर्य कन्या विद्यालय परीक्षा केंद्रावरून २५७ पैकी १९७ परीक्षार्थीनीं परीक्षा दिली. ६० जण गैरहजर होते. महाराष्टÑ लोकसेवा अयोग तर्फे गट ‘क’ पुर्व परीक्षेस एकूण १७२१ पैकी १३४४ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर ३७७ उमेदवार सदर परीक्षेस अनुपस्थित होते.
परीक्षा केंद्रावर डिजिटल डायरी, कॅल्क्युलेटर, पुस्तके, पेपर्स, पेजर मायक्रोफोन, मोबाईल फोन कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सीमकार्ड, दूरसंचार साधने म्हणून वापरण्या योग्य कोणतीही वस्तू, बॅग्ज अथवा शासनाने बंदी घातलेल्या इतर कोणत्याही साहित्यासह केंद्राच्या परिसरात कक्षात आणण्यास किंवा स्वत:जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले होते.
हिंगोली जिल्ह्यातील सातही केंद्रावरून परीक्षा सुरळीत पार पडली. सदर परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी जिल्हा प्रशासनाकडून पहिले प्रशिक्षण ६ जून रोजी घेण्यात आले. सदर प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या.