शिबिरे न घेताही शैक्षणिक कामासाठी वाटले १.३६ लाख दाखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:32 AM2021-08-22T04:32:35+5:302021-08-22T04:32:35+5:30
हिंगोली जिल्ह्यात यंदा केवळ औंढा नागनाथ तालुक्यात दोन शिबिरे वगळली तर इतर ठिकाणी असे एकही शिबिर झाले नाही. मुलांच्या ...
हिंगोली जिल्ह्यात यंदा केवळ औंढा नागनाथ तालुक्यात दोन शिबिरे वगळली तर इतर ठिकाणी असे एकही शिबिर झाले नाही. मुलांच्या शाळाही यंदा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. काहींचे तर निकालच वेळेवर लागले नाहीत. शिवाय कोरोनामुळे शाळांमध्येही विविध प्रमाणपत्रांसाठी थोडी मुभा दिली जात असल्याचे दिसत होते. तरीही जून महिन्यात अथवा त्यापूर्वीच या दाखल्यांसाठी मोठी गर्दी होत असते. यंदा एकट्या जून महिन्यात जातीचा दाखला २१६, अधिवास दाखला ९०३, उत्पन्नाचा दाखला ४८०९, रहिवासी दाखला ९१२, इतर दाखले ११२८, नॉन क्रिमिलेअर ९४ जणांनी घेतला. या महिन्यात विविध प्रकारचे ८०६२ दाखले देण्यात आले.
वर्षभरात १.३६ लाख दाखले
हिंगोली जिल्ह्यात १ ऑगस्ट २०२० पासून ते जूनपर्यंत एकूण १.३६ लाख दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये हिंगोली १६ हजार ४०३, कळमनुरी २४ हजार ८१८, सेनगाव ४१ हजार ६५३, औंढा ना. ३० हजार ९०२, वसमत २२ हजार ७१८ अशी तालुकानिहाय दाखल्यांची संख्या आहे.