कोरोनाचे नवे १४ रुग्ण ; २७ जण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:22 AM2021-06-05T04:22:40+5:302021-06-05T04:22:40+5:30
रॅपिड अँटिजन चाचणीत हिंगोली परिसरात ४७ पैकी बावणखोली १ , कमलानगर १ असे दोन रुग्ण आढळून आले. सेनगाव परिसरात ...
रॅपिड अँटिजन चाचणीत हिंगोली परिसरात ४७ पैकी बावणखोली १ , कमलानगर १ असे दोन रुग्ण आढळून आले. सेनगाव परिसरात ५४, वसमत परिसरात ७६, औंढा परिसरात ४३, कळमनुरी परिसरात ९३ जणांची चाचणी केली असून एकही बाधित आढळला नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात तळणी १, जिजामातानगर १, नवीन पोलीस वसाहत १, कमलानगर १, सवना १, देवकरवाडी १ असे ६ रुग्ण आढळून आले. कळमनुरी परिसरात रूद्रवाडी २, असोलवाडी १ असे तीन रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात सेनगावात एक रुग्ण आढळला. वसमत परिसरात हट्टा १ व लिंगी येथे १ रुग्ण आढळला.
बरे झाल्याने आज २७ रुग्णांना डिस्चार्ज दिला. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयातून २१, कळमनुरी १, सेनगाव ३, लिंबाळा २ जणांना डिस्चार्ज दिला.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५ हजार ७७३ रुग्ण झाले असून, त्यापैकी १५ हजार १७९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आजघडीला जिल्ह्यात एकूण २२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत ३६८ व्यक्तींचा मृत्यू झाला. सध्या दाखल रुग्णांपैकी ९४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे तर १३ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात दोन मृत्यू
हिंगोली जिल्ह्यात आज कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात येहळेगाव सोळंके येथील ५२ वर्षीय पुरुष व उमरदरा (ता. कळमनुरी) येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृतात समावेश आहे.