१४ उपकेंद्रांवरून घेण्यात आली महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:46 AM2019-03-25T00:46:59+5:302019-03-25T00:47:13+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०१९ दिनांक २४ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हिंगोली मुख्यालयातील १४ उपकेंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेस २८७९ पैकी २५२९ परीक्षार्थींनी परीक्षा दिली.

 14 sub-centers were conducted by the Maharashtra Secondary Examination Examination | १४ उपकेंद्रांवरून घेण्यात आली महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा

१४ उपकेंद्रांवरून घेण्यात आली महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०१९ दिनांक २४ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हिंगोली मुख्यालयातील १४ उपकेंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेस २८७९ पैकी २५२९ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. तर ३५० जण परीक्षेस गैरहजर होते.
महाराष्टÑ दुय्यम निरीक्षक पूर्व परीक्षा हिंगोली शहरातील १४ उपकेंद्रावरून घेण्यात आली. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांनी दिली. आदर्श महाविद्यालय भाग ‘अ’ एकूण परीक्षार्थी ३३६ हजर २९५ गैरहजर ४१, आदर्श महाविद्यालय भाग २ एकूण परीक्षार्थी ३३६, हजर ३०६, गैरहजर ३०, शासकीय तंत्रनिकेतन एकूण परीक्षार्थी २८८, हजर २४८, गैरहजर ४०, सरजूदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय एकूण परीक्षार्थी २६४, हजर २३४, गैरहजर ३०, सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल एकूण परीक्षार्थी २४०, हजर २०७, गैरहजर ३३, पोदार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल एकूण परीक्षार्थी १९२, हजर १६४, गैरहजर २८, जिल्हा परिषद कन्या शाळा एकूण परीक्षार्थी १६८, हजर १४८, गैरहजर २०, जिल्हा परिषद बहुविध प्रशाला एकूण परीक्षार्थी १६८, हजर १४३, गैरहजर २५, खाकीबाबा इंग्लिश स्कूल एकूण परीक्षार्थी १४४, हजर १२७, गैरहजर १७, खुराणा सावंत इंजिनिअरिंग स्कुल एकूण परीक्षार्थी १४४, हजर १२८, गैरहजर १६, शिवाजी महाविद्यालय एकूण परीक्षार्थी १४४, हजर १२९, गैरहजर १५, अनसूया विद्यामंदिर एकूण परीक्षार्थी १४४, हजर १२६, गैरहजर १८, शांताबाई मुंजाजी दराडे विद्यालय एकूण परीक्षार्थी १६८, हजर १४९, गैरहजर १९, माणिक स्मारक आर्य विद्यालय एकूण परीक्षार्थी १४३, हजर १२५, गैरहजर १८ होते. १४ उपकेंद्रावरून घेण्यात आलेल्या परीक्षेस एकूण २८७९ पैकी २५२९ परीक्षार्थींनी महाराष्टÑ दुय्यम निरीक्षक पूर्व परीक्षा दिली. तर एकूण ३५० परीक्षार्थी परीक्षेस गैरहजर होते.

Web Title:  14 sub-centers were conducted by the Maharashtra Secondary Examination Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.