ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १४०० कर्मचारी तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:25 AM2021-01-14T04:25:19+5:302021-01-14T04:25:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औंढा नागनाथ : तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींपैकी ७१ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील १७ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींपैकी ७१ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील १७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १ हजार ४०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून ईव्हीएमसह निवडणुकीच्या साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांनी दिली.
फाेटाे नं. २०
औंढा नागनाथ तहसील परिसरामध्ये भव्य असा सभामंडप टाकण्यात आलेला आहे. या निवडणुकीसाठी औंढा तहसीलने जय्यत तयारी केली आहे. या निवडणुकीचा आढावा १३ जानेवारी राेजी उपजिल्हाधिकारी तथा ग्रामपंचायत निवडणूक निरीक्षक संतोषी देवकुळे यांच्यासह निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले, नायब तहसीलदार सचिन जोशी, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, शैलेश वाईकर यांनी घेतला. १५ जानेवारीला ७१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. एकूण २१४ प्रभागांमधील ५९७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मतपेटीमध्ये बंद होणार आहे. या निवडणुकीसाठी पोलीस अधिकाऱ्यांसह ३०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.