४९ ग्रामपंचायतींमध्ये १४१ उमेदवार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:17 AM2021-01-13T05:17:12+5:302021-01-13T05:17:12+5:30
४९ ग्रामपंचायतींमध्ये २ ते ५ जागांसाठी मतदान हाेणार आहे. तसेच तालुक्यातील पूर्णतः बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या १५ आहे. ...
४९ ग्रामपंचायतींमध्ये २ ते ५ जागांसाठी मतदान हाेणार आहे. तसेच तालुक्यातील पूर्णतः बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या १५ आहे. तर ग्रामपंचायतीच्या एकूण जागांसाठी वैध नामनिर्देशनपत्र अप्राप्त असल्यामुळे व उर्वरित जागा बिनविरोध झाल्यामुळे प्रत्यक्ष मतदान होणार नाही. अशा ग्रामपंचायतींची संख्या ४ आहे. बिनविरोध ग्रामपंचायतीतील व बिनविरोध निवड झालेल्या जागांची संख्या २६० इतकी आहे, तर तालुक्यात प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या जागांची संख्या ६१५ आहे. तालुक्यातील काही गावांच्या प्रभागांतील सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यात कडपदेव, कसबे धावंडा, कामठा, किल्लेवडगाव, कुपटी, कान्हेगाव, खरवड, महारी बु., मुंढळ, पार्डी, पोत्रा, गोरलेगाव यासह ४९ गावांतील काही प्रभागांतील उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. तालुक्यात २७६ मतदान केंद्र असून यातील १९ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत.