१.४१ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:47 AM2018-03-04T00:47:17+5:302018-03-04T00:47:21+5:30
येथे पावरलूम भागात पोलिसांच्या छाप्यात १ लाख ४१ हजाराचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आला. गुटखा तस्करांच्या कारवाया वाढल्या असताना पोलिसांची ही या कारवाई तस्करांना इशारा समजली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : येथे पावरलूम भागात पोलिसांच्या छाप्यात १ लाख ४१ हजाराचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आला. गुटखा तस्करांच्या कारवाया वाढल्या असताना पोलिसांची ही या कारवाई तस्करांना इशारा समजली जात आहे.
वसमत शहर तालुक्यात गुटखा तस्करी प्रचंड वाढली आहे. अर्धापूर मार्गे वसमतमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा येत आहे. वाहनांनी येणारा हा गुटखा जिंतूर टी पॉर्इंटवर चौवीस तास पोलिस तपासणीकरिता तैनात असतानाही कधी सापडत नाही. वसमत शहराच्या विविध भागात खुलेआम गुटखा साठा व विक्री होतो. मात्र संबंधीत बिट जमादारांनाही तो दिसत नाही. अन्न व भेसळ विभागाने तर वसमतमध्ये गुटखा विक्रीकडे न पाहण्याचा निर्णय घेतल्यासारखे वातावरण आहे. त्यातून गुटखा प्रचंड प्रमाणात दाखल होत आहे. २ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी वसमत शहर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने छापा मारला. पावरलूम भागातील एका दुकानात साठा जप्त केला १ लाख ४१ हजाराच्या गुटख्यासह एक जणास ताब्यात घेण्यात आले आहे. गुटखा विक्रीमध्ये काही राजकीय लेबल असलेल्यांचा शिरकाव झाल्याचीही जोरात चर्चा रंगत आहे.