सद्भाव मंडपासाठी १.४६ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:26 AM2020-12-23T04:26:05+5:302020-12-23T04:26:05+5:30
केंद्र शासनाने २०१८ मध्ये अल्पसंख्याक विभागाच्या शक्तीप्रदान समितीत हिंगोलीत अल्पसंख्यांकांसाठी सद्भाव मंडप उभारण्यासाठी १.४६ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली ...
केंद्र शासनाने २०१८ मध्ये अल्पसंख्याक विभागाच्या शक्तीप्रदान समितीत हिंगोलीत अल्पसंख्यांकांसाठी सद्भाव मंडप उभारण्यासाठी १.४६ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली होती. त्याचा पहिला टप्पा २०१९ मध्ये जानेवारी महिन्यात वितरित केला होता. तर १ डिसेंबरच्या केंद्र शासनाच्या पत्रान्वये दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरित करण्यात आला आहे. यात केंद्र ६० तर राज्य ४० टक्क्यांचा वाटा उचलणार आहे. ही रक्कम ४३.८० लाख एवढी आहे. यापूर्वीही तेवढ्याच रक्कमेचा हप्ता मंजूर झला होता. ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांनी आहरित करून संबंधित यंत्रणेला प्रदान करण्यास सांगण्यात आले आहे. हे काम करून त्याची माहिती कस्ट्रक्शन ट्रॅकरवर सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.
अल्पसंख्यांकांसाठी हे मंडप मंजूर झाल्याने यात हिंगोली शहरात आणखी एक सामाजिक कार्यासाठी उपयुक्त ठरणारी वास्तु उभी राहणार आहे. त्याचा या प्रवर्गातील समाज घटकांना फायदा होणार आहे.