जिल्ह्यात १६ मिमी बरसला पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:25 AM2021-07-25T04:25:18+5:302021-07-25T04:25:18+5:30
जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला असला तरी ठिकाण बदलून पाऊस होत आहे. औंढा तालुक्यात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. तर ...
जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला असला तरी ठिकाण बदलून पाऊस होत आहे. औंढा तालुक्यात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. तर इतर तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचे पहावयास मिळाले. शनिवारपर्यंत मागच्या २४ तासांत जिल्ह्यात १६.४० मिमी. पावसाची नोंद झाली असून, यात हिंगोली तालुक्यात २३.३०, कळमनुरी ११.१०, वसमत १७.७०, औंढा नागनाथ ३३.२०, सेनगाव तालुक्यात सर्वात कमी २.२० मिलीमीटर पाऊस झाला. या पावसामुळे ओढा, नाल्यांना काही भागात पूर आला होता. कयाधू नदीलाही पूर आल्याचे चित्र होते.
आतापर्यंत ५४८.६० मिमी पाऊस
जिल्ह्यात गतवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत ९५८.२० मिलीमीटर पाऊस झाला होता. याची टक्केवारी १२०.४८ एवढी झाली होती. तर यावर्षी आतापर्यंत ५४८.६० मिमी पाऊस झाला आहे. यात सर्वाधिक पाऊस औंढा तालुक्यात ६४०.२० मिमी तर सर्वात कमी सेनगाव तालुक्यात झाला. सेनगाव तालुक्यात आतापर्यंत ४९७.४० मिमी पाऊस झाला आहे.
आतापर्यंत झालेला पाऊस (मान्सून कालावधी)
तालुका सर्वसाधारण पाऊस एकूण झालेला पाऊस टक्केवारी
हिंगोली ८६७.९० ५३६.३० ६१.७९
कळमनुरी ७९५.४० ५५२.४० ६९.४५
वसमत ८२४.०० ५५०.३० ६६.७८
औंढा ७३६.१० ६४०.२० ८६.९७
सेनगाव ७२९.७० ४९७.४० ६८.१६
एकूण ७९५.३० ५४८.६० ६८.९८