१६ क्विंटल हळद गेली चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:55 AM2018-05-13T00:55:49+5:302018-05-13T00:55:49+5:30
वसमत तालुक्यातील बोरीसावंत येथील परभणी-हिंगोली राज्य रस्त्यालगत असलेल्या आखाड्यावरून शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी दोन शेतकऱ्यांची २७ कट्टे अंदाजित १६ क्विंटल हळद चोरुन नेल्याने परिसरात शेतकºयांमध्ये चांगले भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : वसमत तालुक्यातील बोरीसावंत येथील परभणी-हिंगोली राज्य रस्त्यालगत असलेल्या आखाड्यावरून शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी दोन शेतकऱ्यांची २७ कट्टे अंदाजित १६ क्विंटल हळद चोरुन नेल्याने परिसरात शेतकºयांमध्ये चांगले भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परभणी-हिंगोली राज्य रस्त्यावर बोरी सावंत येथील एका शेतकºयाचा आखाडा आहे. त्या आखाड्यावर माणिकराव उत्तमराव सावंत व विनायक प्रल्हादराव सावंत यांची २७ कट्टे हळद होती. ती अंदाजे १६ क्विंटल व १,३०,००० हजार रुपये किमतीची होती. मात्र ती चोरीला गेली. चोरट्यांनी वाहन परभणी- हिंगोली रस्त्यावर लावून ही हळदीचे पोते डोक्यावर घेवून चोरी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या दोन्ही शेतकºयांचे सोयाबीनसुद्धा चोरीला गेल्याची घटना घडली होती. चोरीच्या घटनांमुळे मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.