सौर ऊर्जापंपांसाठी १६२७५ अर्ज ; कनेक्शन मात्र ४६५४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:52+5:302021-07-09T04:19:52+5:30

हिंग़ोली: सौरऊर्जा पंपासाठी जिल्ह्यातील १६ हजार २७५ शेतकऱ्यांनी महावितरणकडे अर्ज केला होता. परंतु, महावितरणने परिपूर्ण कागदपत्रे नसल्यामुळे ९ हजार ...

16275 applications for solar power pumps; Connection only 4654 | सौर ऊर्जापंपांसाठी १६२७५ अर्ज ; कनेक्शन मात्र ४६५४

सौर ऊर्जापंपांसाठी १६२७५ अर्ज ; कनेक्शन मात्र ४६५४

Next

हिंग़ोली: सौरऊर्जा पंपासाठी जिल्ह्यातील १६ हजार २७५ शेतकऱ्यांनी महावितरणकडे अर्ज केला होता. परंतु, महावितरणने परिपूर्ण कागदपत्रे नसल्यामुळे ९ हजार ६४२ अर्ज बाद केले असून ४६५४ शेतकऱ्यांनाच कनेक्शन दिले आहेत. जून २०१९ मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील १६ हजार २७५ शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा पंपासाठी महावितरणकडे अर्ज केले होते. त्यातील ९ हजार ६४२ अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे त्या शेतकऱ्यांंना सौर उर्जेपासून दूरच रहावे लागले आहे. जिल्ह्यामध्ये महावितरणकडून ४ हजार ९७१ जणांना सौर पंपाचे कोटेशन दिले आहे. त्यातील ४ हजार ९६० शेतकऱ्यांनी महावितरणकडे कोटेशनची रक्कम जमा केली आहे. यानंतर महावितरणने ४ हजार ६५४ जणांना महावितरणच्या वतीने सौर पंपाचे कनेक्शन दिले आहे.

तालुकानिहाय सौर पंपाचा लाभ घेणारे शेतकरी

एप्रिल २१ ते मे २१

हिंगोली ५५

औंढा २८

सेनगाव २९

कळमनुरी २९

वसमत ४१

एप्रिल २० ते मार्च २१

हिंगोली ५७६

औंढा ४१३

सेनगाव ४२१

कळमनुरी ५२२

वसमत ६२६

एप्रिल १९ ते मार्च २०

हिंगोली ३२८

औौढा ३४०

सेनगाव २८४

कळमनुरी ४०१

वसमत ४३८

प्रतिक्रिया

सौर पंपासाठी अर्ज केला असता माझा अर्ज त्रुटीमध्ये आला आहे. सदरील त्रुटीमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की माझ्या शेतामध्ये महावितरणकडून विद्युत पुरवठा असल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु, वीजपुरवठा हा वारंवार व ऐनवेळी येत असल्यामुळे अर्ज केला आहे. सौर उर्जेचा लाभ महावितरणने द्यावा, असे मला वाटते.

-रामराव थोरात, शेतकरी

सौर ऊर्जा पंपासाठी महावितरणकडे अर्ज केला होता. परंतु, माझा अर्ज त्रुटीत आला आहे. त्यामुळे मी सौर ऊर्जा पंपापासून वंचित राहिलो आहे. शेताजवळून वीजपुरवठा गेला असल्यामुळे माझा अर्ज त्रुटीत आहे, असा संदेश महावितरणकडून प्राप्त झाला आहे.

-जगन्नाथ थोरात, शेतकरी

प्रतिक्रिया

सौर ऊर्जा पंपासाठी १६ हजार २७५ शेतकऱ्यांचे अर्ज आले होते. यामध्ये

४९७१ अर्जदारांनी कोटेशन भरले आहे. यापैकी ४६५४ सौर पंप कार्यान्वित केले आहेत. उर्वरित सौर ऊर्जा पंपाचे काम प्रगतीपथावर आहे. - सुधाकर जाधव, अधीक्षक अभियंता

Web Title: 16275 applications for solar power pumps; Connection only 4654

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.