आरक्षणासाठी १७ वर्षीय मुलीने संपवले जीवन; ग्रामस्थांनी मृतदेह ठेवला तहसील कार्यालयासमोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 04:31 PM2023-11-01T16:31:32+5:302023-11-01T16:34:43+5:30

ग्रामस्थ, नातेवाईक यांच्यासह आंदोलकांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे

17-year-old girl ends her life for Maratha reservation; The villagers kept the death body in front of the Kalamnuri Tehsil office | आरक्षणासाठी १७ वर्षीय मुलीने संपवले जीवन; ग्रामस्थांनी मृतदेह ठेवला तहसील कार्यालयासमोर

आरक्षणासाठी १७ वर्षीय मुलीने संपवले जीवन; ग्रामस्थांनी मृतदेह ठेवला तहसील कार्यालयासमोर

कळमनुरी ( हिंगोली) : माळधामणी येथे आज सकाळी 11.30 ते 12 वाजेच्या दरम्यान एका 17 वर्षीय मुलीने आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलले. आरती नागोराव शिंदे असे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह कळमनुरी तहसील कार्यालयासमोर ठेवून आरक्षणाची मागणीकरत रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे.  

आरती नागोराव शिंदे या मुलीने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेहाजवळ आढळून आलेल्या चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान, शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणलेला मृतदेह ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर दुपारी 3.30 वाजेच्या दरम्यान आणून ठेवला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा या माळधामनीवासीयांनी घेतला. हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर आंदोलकांनी रास्तारोको केला आहे. 

Web Title: 17-year-old girl ends her life for Maratha reservation; The villagers kept the death body in front of the Kalamnuri Tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.