हिंगोली जिल्ह्यातील १८०० संस्था रद्द होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 11:45 PM2018-02-01T23:45:17+5:302018-02-02T11:02:26+5:30

मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील अकार्यक्षम सेवाभावी संस्थाची तपासणी केली जात होती. यामध्ये ५१८ संस्थाची तपासणी केली असता ४१८ संस्था अकार्यक्षम असल्याचे दिसून आल्याने त्या रद्द केल्या होत्या.

 1800 institutions on the way to cancel | हिंगोली जिल्ह्यातील १८०० संस्था रद्द होण्याच्या मार्गावर

हिंगोली जिल्ह्यातील १८०० संस्था रद्द होण्याच्या मार्गावर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील अकार्यक्षम सेवाभावी संस्थाची तपासणी केली जात होती. यामध्ये ५१८ संस्थाची तपासणी केली असता ४१८ संस्था अकार्यक्षम असल्याचे दिसून आल्याने त्या रद्द केल्या होत्या. आता तर चक्क पुन्हा १८०० संस्था रडारवर आहेत. त्यामुळे संस्थाचालकामध्ये चांगलाच गोंधळ उडालेला असल्याचे ऐकावयास मिळत आहे.
धर्मदाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे ७ हजार ५०० स्वयंसेवी संस्थानी रीतसर नोंदणी केलेली आहे. यातील अकार्यक्षम स्थांची टप्याटप्याने तपासणी केली जात असून, पहिल्या टप्यात ५१८ संस्थाच्या कामकाजाची तपासणी केली असता, त्यातील फक्त १०० संस्थाचेच काम व्यवस्थित असल्याने ४१८ संस्थांची नोंदणी धर्मदाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने रद्द केली आहे. तर दुसºया टप्प्यात तपासणीसाठी एकूण १८०० संस्थाची यादी जाहीर करण्यात आली आहे. नोंदणीकृत संस्थांनी कुठल्याही प्रकारचे अर्ज कार्यालयात सादर केले नसल्याने कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. मात्र कोणत्याही संस्थेकडून प्रतिसादच न मिळाल्याने वरिष्ठांच्या आदेशावरुन धर्मदाय सहाय्यक आयुक्तांनी संस्थाची तपासणी सुरु केली आहे.
यात पहिल्या टप्प्यात कुठल्याही संस्थांनी अर्जाशिवाय प्रकरणे बोर्डावर ठेवलेली आढळून आली नाहीत. तर पुन्हा तब्बल १८०० संस्थाची यादीच जाहीर केल्यामुळे संस्थाचालकांमध्ये खळबळ उडाली असून, कागदपत्रे गोळा करण्यात व कधी नव्हे ते राबविलले उपक्रमाच्या याद्या पाहण्यात मग्न झाले आहेत. संस्थेची मान्यता रद्द करण्यासाठी कसोसीने प्रयत्न करण्यात येत आहेत. रात्रंदिवस कागदपत्रांची जुळवा जुळव केली जात आहे.
जिल्ह्यातील बºयाच संस्थांची कामे कागदोपत्रीच राबविले जातात. तर जास्तीत जास्त युग पुरुषांची जयंती व पुण्यतिथीव्यतिरिक्त कार्यक्रम सोडले तर इतर कार्यक्रमच राबविले जात नाहीत. मात्र त्या- त्या तारखीच्या कागदपत्रांची जुळवा जुळव करुन त्याची फाईल मात्र न विसरता बनविली जाते.
तसेच कधी - कधी तर तोडका मोडका कार्यक्रम फोटोशेसनपुरता घेतल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे अशा संस्थाचालकांना मात्र हा कागदपत्रांच्या तपासणीमध्ये चांगलाच भोवणार आहे. तरीही कागदपत्राच्या जुळवा जुळवीसाठी प्रयत्न आहेत.
संस्थाची आकडेवारी जाहीर केल्याने अनेक संस्था चालकामध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे विविध डीटीपी सेंटरवर व संस्थाचे आॅडिट करणाºयांजवळ एकच गर्दी होत आहे.

Web Title:  1800 institutions on the way to cancel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.