निवडणूक प्रशिक्षणाला १९ कर्मचाऱ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:30 AM2021-01-03T04:30:28+5:302021-01-03T04:30:28+5:30
कळमनुरी : तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. मतदान प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह ...
कळमनुरी : तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. मतदान प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह येथे २ जानेवारी रोजी दोन सत्रांत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाला १४६० पैकी १९ कर्मचारी गैरहजर होते. या गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेबाबत शनिवारी प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार दत्तू शेवाळे, गटविकास अधिकारी डॉ. आदिनाथ आंधळे, गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे, मुख्याधिकारी उमेश कोठीकर आदींनी ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेबाबत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. अधिकारी व मास्टर ट्रेनर यांनी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षणही दिले. या प्रशिक्षणाला १४६० मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी १९ कर्मचारी प्रशिक्षणाला गैरहजर होते. या गैरहजर कर्मचाऱ्यांना आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये, याबाबत नोटिसा बजावून २४ तासांच्या आत खुलासा मागविला आहे. कर्मचाऱ्यांना सकाळ व दुपार या दोन सत्रांत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार प्रवीण ऋषी, खोकले, अब्दुल खालेख, संतोष खिल्लारे, राजकुमार उंडगे, सय्यद अनिस आदींनी परिश्रम घेतले.
फाेटाे नं.२३