महिनाभरात १९ आगी; अग्निशामक बंब एकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:38 AM2018-04-23T00:38:13+5:302018-04-23T00:38:13+5:30

अचानक लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशामक दलातर्फे प्रयत्न केले जातात. हिंगोली नगर परिषदकडे सध्या केवळ एकच अग्निशामक वाहन उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यास कार्यरत कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

 19 fireworks a month; Fire extinguisher only one | महिनाभरात १९ आगी; अग्निशामक बंब एकच

महिनाभरात १९ आगी; अग्निशामक बंब एकच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अचानक लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशामक दलातर्फे प्रयत्न केले जातात. हिंगोली नगर परिषदकडे सध्या केवळ एकच अग्निशामक वाहन उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यास कार्यरत कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटनांत वाढ होत आहे. महिनाभरात शहरासह ग्रामीण भागात १९ आग लागल्यच्या घटना घडल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढतच चालला आहे. तापमानात वाढ होत असल्याने अचानक आग लागण्याच्या घटनांतही वाढ होत आहे. २३ मार्च ते २२ एप्रिल दरम्यान आगीच्या १९ घटनांची नोंद पालिकेच्या अग्निशामक दलाकडे करण्यात आली आहे. महिनाभरात आग लागून नुकसानीच्या घटनामध्ये वाढ होत चालली असली तरी, पालिकेकडे सध्या एचक अग्निशामक वाहन उपलब्ध आहे. एक अग्निशामक मागील सहा महिन्यांपासून नादुरूस्त झाल्याने भंगारात जमा करण्यात आले आले आहे. नवीन अग्निशामकची मागणी केली असून लवकरच पालिकेकडे वाहन उपलब्ध होईल. शिवाय नागरिकांनी दक्ष राहून आगीच्या घटनांबाबबत तात्काळ माहिती द्यावी. व आग लागू नये याची खबदारी सर्वांनीच घ्यावी असे अग्निशामक विभागाचे बाळू बांगर यांनी केले .
हिंगोली शहरासह ग्रामीण भागात मागील एका महिन्यात आग लागल्याचे जवळपास १९ घटना घडल्या आहेत. उन्हाळ्यात अचानक आग लागून घरांचे, दुकानांचे तसेच वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. परंतु हिंगोली नगर पालिकेकडे मागील सहा महिन्यांपासून केवळ एकाच अग्शिामक वाहनांवर काम सुरू आहे.
पुर्वी दोन अग्निशाम होते. परंतु त्यातील एक वाहन नादुरूस्त झाल्याने ते भंगारात जमा केले. त्यामुळे सध्या पालिकेचा कारभार एकाचा वाहनांवर सुरू आहे. नवीन अग्निशामक वाहनाची मागणी करण्यात आली आहे. लवकरच पालिकेला वाहन मिळणार आहे.
सध्या कडाक्याचे उन्ह पडत असून तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे बीडी, सिगारेटमुळे पेट धरून आग लागेल असे कृत्य कोणी करू नये, शिवाय कचराही सार्वजनिक ठिकाणी जाळू नये.
इडोळी येथे आग लागून साहित्य खाक
४हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील ज्ञानबा विठोबा पानपट्टे यांच्या आखाड्याला आग लागल्याची घटना २१ एप्रिल रोजी घडली. आगीत शेतीपयोगी औजारे, जमा करून ठेवलेले तुरीचे व, सोयाबीनचे कुटार, वैरण, दोन वर्षाचे शेणखत, गांडूळ खताचे १०० कट्टे अंदाजे ५० क्विंटल असे साहित्य जळून खाक झाले आहे. त्यांनी अग्नीशमनला फोन करून दोन विद्युत मोटारी चालू असूनही ही आग आटोक्यात येत नव्हती. अग्नीशमन दल आल्यानंतर ही आग आटोक्यात आली. या शेतकºयाकडे १० जनावरे आहेत. वैरण जळून खाक झाल्यामुळे या गुरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून काही नुकसान भरपाई मिळेल का? असा प्रश्न पानपट्टे यांनी उपस्थित केला.

Web Title:  19 fireworks a month; Fire extinguisher only one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.