१९५२ मुलींना मिळणार सायकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 11:52 PM2018-11-02T23:52:55+5:302018-11-02T23:53:23+5:30
शाळेपासून पाच किमी अंतरावरील मुलींना दरवर्षी मानव विकास योजने अंतर्गत मोफत सायकल वाटप करण्यात येतात. यावर्षी एकूण १ हजार ९५२ विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार असून त्यासाठी लागणारा ६८ लाख ३२ हजारांचा निधी मानव विकासकडून शिक्षण विभागाच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शाळेपासून पाच किमी अंतरावरील मुलींना दरवर्षी मानव विकास योजने अंतर्गत मोफत सायकल वाटप करण्यात येतात. यावर्षी एकूण १ हजार ९५२ विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार असून त्यासाठी लागणारा ६८ लाख ३२ हजारांचा निधी मानव विकासकडून शिक्षण विभागाच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.
शाळेतील मुलींची गळती थांबावी व शाळेत येताना विद्यार्थिनींची पायपीट होऊ नये, यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. त्या अनुषंगानेच मानव विकास कार्यक्रम अंतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून पाच किमी अंतरावर राहणाऱ्या गरजू मुलींना मोफत सायकल वाटप केल्या जातात. लाभार्थी मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी ३ हजार ५०० रूपये रक्कम बँक खात्यावर जमा केली जाते. सायकल खरेदी करण्यासाठी प्रथम लाभार्थी विद्यार्थिनीच्या खात्यावर २ हजार रूपये जमा केले जाणार आहेत. उर्वरीत १ हजार ५०० रूपये सायकल खरेदी केल्याची रीतसर पावती दाखल केल्यानंतर बँकेत जमा करण्यात येणार आहेत.
शिक्षण विभागाकडून मानव विकासकडे लाभार्थी मुलींच्या याद्या वेळेत पोहोचत नाहीत. संबधित गटशिक्षणाधिकाºयांनी सदर याद्या जिल्हा कार्यालयाकडे वेळेत सादर केल्यास मुलींनाही शैक्षणिक कालावधीत योजनेचा लाभ मिळू शकतो. परंतु याकामी दिरंगाई व नियोजनाच्या अभावामुळे मात्र अर्धे शैक्षणिक वर्षे उलटूनही मुलींच्या हातात सायकली पडत नाहीत. त्यामुळे ग्रामीण मुलींची पायपीट होते. सध्या माध्यमिक शिक्षण खात्याला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी नाही. त्यामुळे येथील अनेक कामांचा खोळंबा उडत असल्याचे निदर्शनास येत आहे.
माध्यमिक शिक्षण विभाग : निधी वर्ग
मुलींना मोफत सायकल वाटपासाठी लागणाºया निधीस तांत्रिक मान्यता मिळाली आहे. १७ आॅक्टोबर रोजी जि. प. माध्यमिक शिक्षण विभागाच्या खात्यावर मानव विकासकडून ६८ लाख ३२ हजारांचा निधी वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांच्या खात्यावर लवकरच निधी वर्ग केला जाणार असून प्रक्रीया सुरू असल्याचे माध्यमिक शिक्षणच्या संबधित विभागातर्फे सांगण्यात आले. लाभार्थी मुलीच्या बँक खात्यावरच लाभाची रक्कम जमा होणार आहे.
जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये हिंगोली ६६६, सेनगाव ६६६ तर औंढा नागनाथ ६२० एकूण १ हजार ९५२ लाभार्थी विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहेत.