४७ हजार ३३६ वाहनचालकांकडे थकले २ कोटी ८९ लाख ४ हजार ३०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:26 AM2021-02-15T04:26:28+5:302021-02-15T04:26:28+5:30

याचबरोबर २०१९ मध्ये नो पार्किंग ८ हजार ९९७, धोकादायक वाहने चालविणे ९३, फॅन्सी नंबर प्लेट २४,ट्रिपल सीट १ हजार ...

2 crore 89 lakh 4 thousand 300 rupees to 47 thousand 336 drivers | ४७ हजार ३३६ वाहनचालकांकडे थकले २ कोटी ८९ लाख ४ हजार ३०० रुपये

४७ हजार ३३६ वाहनचालकांकडे थकले २ कोटी ८९ लाख ४ हजार ३०० रुपये

Next

याचबरोबर २०१९ मध्ये नो पार्किंग ८ हजार ९९७, धोकादायक वाहने चालविणे ९३, फॅन्सी नंबर प्लेट २४,ट्रिपल सीट १ हजार ५५५, मोबाइलवर बोलणे ५२३, विनापरवाना ४ हजार ७५१, अधिक वेगाने वाहन चालविणे ५३ अशा १५ हजार ९७२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यापैकी ७ हजार ८३५ वाहनचालकांकडून दंडापोटी १७ लाख ८७ हजार रुपये वाहतूक शाखेने वसूल केले आहेत. तर ४ हजार ६०१ वाहनचालकांकडील ३३ लाख ७५ हजार १०० रुपये येणे बाकीच आहे.

दंड वसूल करण्याची मोहीम सुरूच राहणार

पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली दंड वसूल करण्याची मोहीम सुरूच आहे. नो पार्किंग, धोकादायक वाहने, वेगाने वाहन चालविणे, विनापरवाना वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट लावणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे आदी प्रकारांवर दंड वेळीच लावला जात आहे. ज्या वाहनचालकांना दंड लावण्यात आला आहे, त्यांनी आपल्याकडील दंड वाहतूक शाखेकडे जमा करावा. दंड न भरल्यास वाहनाचा परवाना रद्द होऊ शकतो. वाहनचालकांनी वाहन चालविताना वाहतुकीचे नियम पाळावेत. तसेच वाहतूक शाखेच्या पोलिसांना सहकार्य करून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी.

- ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, हिंगोली

Web Title: 2 crore 89 lakh 4 thousand 300 rupees to 47 thousand 336 drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.