विकास कामांसाठी हिंगोली पालिकेला २ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:55 AM2018-10-09T00:55:41+5:302018-10-09T00:56:08+5:30
येथील नगरपालिकेला विविध विकासात्मक कामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत २ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील नगरपालिकेला विविध विकासात्मक कामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत २ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.
शहरातील मासूम अली कब्रस्तानचे बांधकाम व संरक्षण भिंती उभारणी व भौतिक सुविधांची कामे करण्यात येणार आहेत. तसेच बनावतवाला टीनशेडची बांधकाम व इतर कामे, बावनखोली येथील भारतनगर येथे नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, आदर्शनगर येथे ओपनस्पेसमध्ये वृक्षारोपन तसेच इतर कामे, मस्तानशहानग येथील जुन्या स्ल्याटर हाऊसजवळ संरक्षण भिंत व सिमेंट काँक्रीट तसेच पेन्शनपुरा येथे व्यायाम शाळा आदी कामे केली जाणार आहेत. नगरसेवक नेहाल भैय्या यांनी सदर कामांसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी वरील शिफारस केली. त्या अनुषंगाने निधी उपलब्ध करून देण्यात आला.
८ आॅक्टोबर रोजी सदर आदेशाचे पत्र आ. मुटकुळे यांनी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या स्वाधीन केले. यावेळी नगरसेवक गणेश बांगर, माबुद बागवान, आरेफ लाला, मुझीफ कुरेशी, अभियंता अडसिरे, मनिष राठोड, हमीद प्यारेवाले आदी उपस्थित होते.