दहा तासांत दोन वाटमारे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:51 AM2017-12-26T00:51:14+5:302017-12-26T00:51:42+5:30
बसमध्ये चढताना एका प्रवाशाच्या खिशातील चोरट्यांनी बळजबरीने पैसे काढून घेणा-या दोघांना हिंगोली शहर पोलिसांनी अवघ्या दहा तासांत जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : बसमध्ये चढताना एका प्रवाशाच्या खिशातील चोरट्यांनी बळजबरीने पैसे काढून घेणा-या दोघांना हिंगोली शहर पोलिसांनी अवघ्या दहा तासांत जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीतील रोकड जप्त केली आहे.
हिंगोली शहरातील शेख मैनोद्दीन शेख रब्बानी हे नांदेडकडे जाण्यासाठी हिंगोली बसस्थानकात २४ डिसेंबर रोजी आले होते. यावेळी नांदेड बसमध्ये चढताना त्यांच्या खिशातील बळजबरीने दोघांनी ६ हजार ५०० रुपये काढून घेतले. यावेळी शेख मैनोद्दीन व आरोपींमध्ये झटापट झाली. परंतु चोरटे स्थानकातून पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर घटनेचा तपास पोलिसांनी जलदगतीने केला. त्यामुळे अवघ्या दहा तासांत आरोपी प्रदीप बाबूराव खंदारे (२३), राजू हिरासिंग ठाकूर (२४) या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अशोक मैराळ यांनी पथक तयार केले. तपासाची चक्रे फिरवत पोलिसांच्या पथकाने दोघांना अटक केली. पथकामधील फौजदार ज्ञानोबा मुलगीर, तसेच पोना शेख वसियोद्दीन, सुनील अंभोरे, शेख शकील, शेख मुजीब, सुधीर ढेंबरे, जीवन मस्के आदींनी कारवाई केली.