जिल्ह्यात चाैथ्या दिवशी २ हजार ३८३ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:40 AM2020-12-30T04:40:04+5:302020-12-30T04:40:04+5:30

हिंगोली येथील कल्याण मंडपम् येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळपासून अनेकांनी मोठी गर्दी केली होती. हिंगोली तालुक्यात ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ...

2 thousand 383 applications filed in the district on the 4th day | जिल्ह्यात चाैथ्या दिवशी २ हजार ३८३ अर्ज दाखल

जिल्ह्यात चाैथ्या दिवशी २ हजार ३८३ अर्ज दाखल

Next

हिंगोली येथील कल्याण मंडपम् येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळपासून अनेकांनी मोठी गर्दी केली होती. हिंगोली तालुक्यात ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या चाैथ्या दिवशी ८४ ग्रामपंचायतींसाठी २२४ प्रभागांतून ७४५ अर्ज दाखल झाले आहेत.

कळमनुरीत ६२८ उमेदवारी अर्ज दाखल

कळमनुरी : तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २९ डिसेंबर रोजी ६२८ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांनी दिली. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी ३० टेबलांची व्यवस्था करण्यात आली. मंगळवारी सकाळपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी दिसून आली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिनांकापासून आजपर्यंत एकूण ८१२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

औंढा नागनाथ तालुक्यातून ३६२ अर्ज

औंढा नागनाथ तालुक्यातील ८८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चाैथ्या दिवशी ५४ ग्रा.पं.मधून ५९ प्रभागांसाठी ३६२ अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी दिली.

सेनगाव तालुक्यातून ६४८ अर्ज दाखल

सेनगाव तालुक्यातील ९७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २९ डिसेंबर राेजी ६४८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. एकूण ७३७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती तहसीलदार जीवनकुमार कांबळे यांनी दिली.

वसमत तालुक्यात ८४९ जणांचे अर्ज दाखल

वसमत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चाैथ्या दिवशी ८४९ जणांनी अर्ज दाखल केलेे आहेत. आतापर्यंत एकूण १०३३ जणांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन जैस्वाल यांनी दिली.

Web Title: 2 thousand 383 applications filed in the district on the 4th day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.