लसींचा स्टाॅक संपल्याने २० केंद्र पडली बंद; १ मेपासून काय होणार हाच मोठा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:30 AM2021-04-27T04:30:40+5:302021-04-27T04:30:40+5:30

१६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. सुरुवातीला लसींबाबत नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर उत्साह दिसून आला. पण १७ एप्रिल ते ...

20 centers closed due to depletion of vaccine stock; The big question is what will happen from May 1 | लसींचा स्टाॅक संपल्याने २० केंद्र पडली बंद; १ मेपासून काय होणार हाच मोठा प्रश्न

लसींचा स्टाॅक संपल्याने २० केंद्र पडली बंद; १ मेपासून काय होणार हाच मोठा प्रश्न

Next

१६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. सुरुवातीला लसींबाबत नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर उत्साह दिसून आला. पण १७ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा साठा जिल्ह्यातील संपला आहे. लस उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा रुग्णालयाने कळविले असले तरी २६ एप्रिलपर्यंत तरी लसीकरण बंद होते. आजमितीस १३ केंद्रच सुरू असल्याचे सांगण्यात आले. लसीबाबत ऑनलाइन नोंदणीही करता येणार आहे. नोंदणी केलेले कागदपत्र संबंधित केंद्रावर नेऊन देणे. लसीसाठी आधारकार्ड, पॅनकार्ड आदी ओळखपत्र दाखविणे गरजेचे आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणेच १८ वर्षांवरील सर्वांना लसींचे डोस दिले जाणार आहेत.

१ मेनंतरचे नियोजन काय?

१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लस दिली जाणार आहे. यासाठी सर्वसुविधा उपलब्ध करून करून दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी सोय नाही, अशावेळेस तेथील केंद्र बदलून दुसऱ्या ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. अद्ययावत सेवा सर्वच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार असून, तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली जाणार आहे. यंत्रसामग्रीही सर्वच ठिकाणी बसविली गेली आहे.

कोरोना महामारीचे रुग्ण लक्षात घेऊन शासनाने १८ वर्षांवरील सर्वांनाच देण्याचे ठरविले आहे. यासाठी नागरिकांना ऑनलाइन नोंदणीही करता येणार आहे. ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, अशांनी सदरील प्रमाणपत्र संबंधित केंद्रावर जमा करून लस घ्यावी.

-डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: 20 centers closed due to depletion of vaccine stock; The big question is what will happen from May 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.