२० उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:18 AM2018-12-18T00:18:42+5:302018-12-18T00:19:01+5:30

आखडा बाळापुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना पाचव्या दिवशी २० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याबरोबर एकूण २५ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

20 filing nominations | २० उमेदवारी अर्ज दाखल

२० उमेदवारी अर्ज दाखल

Next

आखाडा बाळापूर : आखडा बाळापुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना पाचव्या दिवशी २० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याबरोबर एकूण २५ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
कृऊबा समिती आ. बाळापूरच्या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी वीस उमेदवारांनी वेगवेगळया गणामधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्याबरोबर एकूण २५ उमेदवारी अर्ज आतापर्यंत दाखल झाले. १७ डिसेंबर रोजी घोडा गणामधून शेतकरी मतदारसंघातून - भरत संजाबराव देशमुख, योगेश मित्रदेव पाटील, जवळा पांचाळ गणातून -शिवाजी बाबुराव सवंडकर ,सिंदगी गणासाठी- अनिल जानकीराम रणखांब, आखाडा बाळापुर गणासाठी -अभिजीत दीलीपराव देशमुख, शेवाळा गणासाठी - श्रीकांत नेमाजी वाघमारे, दांडेगाव गणासाठी- जैसा साहेबराव जाधव, कांडली गणासाठी - विजयकुमार शंकराव कोकरे, सिंदगी गणासाठी - अमोल इरणअप्पा हुंडेकर, पेठवडगाव गणासाठी - सोमनाथ मारुती रणखांब, कांडली गणासाठी - रवी माधवराव कोकरे, दांडेगाव गणासाठी - उल्हास बाबुराव जाधव, वारंगा फाटा गणासाठी - ओम व्यंकटराव कदम, शेवाळा गणासाठी - दत्तात्रय दिलीपराव माने, वारंगाफाटा गणासाठी -नितीन आनंदराव कदम, पिंपळदरी गणासाठी- संजय रंगराव भुरके, नांदापूर गणासाठी- गजानन माणिकराव काळे तर व्यापारी मतदारसंघातून डोंगरकडा येथील बालासाहेब मानेजीराव गावंडे, महेश सुभाषराव गोविंदवार, मारोतराव बापूराव शिंदे अशा एकूण वीस जणांनी उमेदवारी अर्ज भरले. अर्ज दाखलसाठी एक दिवस शिल्लक असताना एकूण २५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

Web Title: 20 filing nominations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.