१८ गावांसाठी २0 टँकर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:51 PM2018-05-29T23:51:41+5:302018-05-29T23:51:41+5:30

उन्हाळ्यातील शेवटचा महिना असल्याने अधिग्रहणे व टँकरची संख्या मागील पंधरा दिवसांत झपाट्याने वाढत चालली आहे. १८ गावांत २0 टँकरच्या ३६ खेपा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

 20 tankers have started for 18 villages | १८ गावांसाठी २0 टँकर सुरू

१८ गावांसाठी २0 टँकर सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : उन्हाळ्यातील शेवटचा महिना असल्याने अधिग्रहणे व टँकरची संख्या मागील पंधरा दिवसांत झपाट्याने वाढत चालली आहे. १८ गावांत २0 टँकरच्या ३६ खेपा सुरू असल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात यंदा अल्पपर्जन्यामुळे सगळीकडेच पाण्यासाठी हाहाकार उडालेला आहे. मात्र सर्वच गावांची तहान टँकरवर भागविणे शक्य नाही. अनेक गावांत अधिग्रहणासाठी स्त्रोत उपलब्ध असतानाही प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थ टंचाईचा सामना करीत आहेत. विशेष म्हणजे गावातील वादातून टंचाई भोगणारे ग्रामस्थ शेतात तीन किमी अंतरावर जाऊन पाणी आणत असल्याचेही चित्र काही ठिकाणी आहे.
ही विदारक स्थिती असताना ज्या गावांतून वेळेत प्रस्ताव आले, तपासणी झाली अशा गावांना मात्र टँकरने पाणीपुरवठा अथवा अधिग्रहण करण्यात आले आहे. हिंगोली तालुक्यात ४ गावे व एका वाडीला एका शासकीय व सहा खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण ९ खेपा होत आहेत. ४२५0 लोकसंख्येची तहान यावर भागत आहे. तर टँकरसाठी तीन व त्याशिवाय ३५ स्त्रोत अधिग्रहित केले आहेत. कळमनुरी तालुक्यात ८ गावांत सहा खाजगी टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यात टँकरसाठी ७ तर इतर ४५ अशा ५२ स्त्रोतांचे अधिग्रहण केले आहे. एकूण ८0८५ लोकसंख्येची तहान टँकरवर भागत आहे.
सेनगाव तालुक्यातील ४ गावांमध्ये ६ टँकरच्या ९ खेपा होत आहेत. टँकरसाठी ४ तर इतर ४४ स्त्रोतांचे अधिग्रहण करून तालुक्याची तहान भागविली जात आहे. औंढा नागनाथ तालुक्यात २ गावे ३ वाड्यांसाठी ३ टँकरद्वारे ९ खेपा सुरू आहेत. यात टँकरसाठी ३ तर इतर ठिकाणी ३४ स्त्रोतांचे अधिग्रहण केले आहे.
टँकर : तालुकानिहाय गावे
तालुकानिहाय टँकरग्रस्त गावे
हिंगोली तालुक्यात कनका, पेडगाव वाडी व जुमडा, अंधारवाडी, वºहाडी, कळमनुरी तालुक्यात माळधावंडा-खापरखेडा, मसोड, हातमाली, रामवाडी, शिवणी खु., महालिंगी तांडा, कुपटी, सेनगाव तालुक्यात
जयपूर, जवळा बु., कहाकर खु., बटवाडी, औंढा तालुक्यात संघनाईक तांडा, येहळेगाव सोळंके, रामेश्वर, काळापाणी तांडा, सेवादास तांडा या गावांत टँकरने पाणीपुरवठा होत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे टँकरच्या खेपा वाढत आहेत.
अनेक गावांचे टँकर व अधिग्रहणाचे प्रस्ताव आहेत. पाहणीअंती काही ठिकाणी या दोन्ही उपायांबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अशी गावे तहानलेलीच आहेत.
रस्त्यांची अडचण
४जिल्ह्यातील काही गावांत रस्त्यांची अडचण असल्याने टँकर पंक्चर होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिक टँकरच्या प्रतीक्षेत राहतात अन् ते वेळेवर येत नाही, असे प्रकार घडत आहेत. काही टँकरच्या योग्य स्थितीत नाहीत. त्यामुळे ही एक अडचणही समोर येत आहे.

Web Title:  20 tankers have started for 18 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.