तिसऱ्या आठवड्यात २०३५ विद्यार्थी हजर; सर्वजण ठणठणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:28 AM2020-12-22T04:28:22+5:302020-12-22T04:28:22+5:30
हिंगोली जिल्ह्यात नववी ते बारावीच्या एकूण ३०४ खाजगी शाळा आहेत. तर विद्यार्थीसंख्या ६५९७० आहे. सध्या ४१ शाळा सुरू ...
हिंगोली जिल्ह्यात नववी ते बारावीच्या एकूण ३०४ खाजगी शाळा आहेत. तर विद्यार्थीसंख्या ६५९७० आहे. सध्या ४१ शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. २२५५ शिक्षक व ४५६ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात ६६ शिक्षक व १४ कमर्मचारी बाधित आढळले होते. त्यांच्यावर उपचारही करण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने या शाळाही आता सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील आणखी ६० शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव जि.प.च्या माध्यमिक विभागाकडे तयार आहेत. सध्या सुरू असलेल्या शाळांत २१०५ विद्यार्थी रोज हजेरी लावत आहेत. अनेकांचे पालक मुले पाठवायला तयार नाहीत. जि.प.च्या २९ आहेत. त्यापैकी १७ सुरू झाल्या आहेत.
पालकांच्या तक्रारी
अनेक ठिकाणी अजूनही पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. या मुलांची योग्य काळजी घेतली जाईल का? मुलांच्या तपासण्या न करताच शाळा सुरू होत असल्याचा धोका नाही का? अशा अनेक तक्रारी पालकांच्या आहेत.
शालेय शिक्षण समिती, पालक शिक्षक संघ यांच्या संमतीने शाळा सुरू केल्या जात आहेत. हळूहळू प्रस्ताव वाढत चालले असून उपस्थितीही वाढली.
- पी.बी. पावसे, शिक्षणाधिकारी