परभणी विभागातील २०४ चालक - वाहक मुंबई येथे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:30 AM2021-01-03T04:30:01+5:302021-01-03T04:30:01+5:30
परभणी विभागाअंतर्गत गंगाखेड, पाथरी, परभणी, जिंतूर, हिंगोली, वसमत, कळमनुरी हे ७ आगार येतात. कळमनुरी आगारातून १४, हिंगोली ३२, वसमत ...
परभणी विभागाअंतर्गत गंगाखेड, पाथरी, परभणी, जिंतूर, हिंगोली, वसमत, कळमनुरी हे ७ आगार येतात. कळमनुरी आगारातून १४, हिंगोली ३२, वसमत ३० असे जिल्ह्यातील आगारांतून ७६ चालक -वाहक तर परभणी जिल्ह्यातील ४ आगारांतून १२८ चालक-वाहक मुंबई येथील कुर्ला येथे ड्युटीसाठी जात आहेत. मुंबई येथे एसटीला चालक-वाहक कमी पडत असल्यामुळे परभणी विभागातील चालक -वाहक मुंबई येथे जात आहेत. चालक-वाहक प्रत्येकी पंधरा दिवस ड्युटीसाठी जात आहेत. टप्प्याटप्प्याने सर्वच चालक-वाहकांना पंधरा दिवसांसाठी मुंबई येथे पाठविण्यात येत आहे. हे चालक-वाहक मुंबई येथे जात असल्यामुळे परभणी विभागातील सातही आगारांत चालक - वाहक कमी पडत आहेत. परिणामी ग्रामीण भागात बसेस सोडण्यात आलेल्या नाहीत. ग्रामीण भागात बसेस सोडण्यात आल्या नसल्यामुळे अवैध वाहतूक बोकाळली आहे. स्थानकप्रमुख शेख फेरोज हेही मुंबई येथे ड्युटीवर जात आहेत.