कोरोनाकाळात २१ बालविवाह रोखले; दोनवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:21 AM2021-07-20T04:21:14+5:302021-07-20T04:21:14+5:30

घरची गरीबी परिस्थिती व आर्थिक विवंचनेतून हे बालविवाह होत होते, असे तपासाअंति समोर आले आहे. एकंदर कोरोनाकाळात २१ बाल ...

21 child marriages prevented during Corona period; Two were charged | कोरोनाकाळात २१ बालविवाह रोखले; दोनवर गुन्हे दाखल

कोरोनाकाळात २१ बालविवाह रोखले; दोनवर गुन्हे दाखल

Next

घरची गरीबी परिस्थिती व आर्थिक विवंचनेतून हे बालविवाह होत होते, असे तपासाअंति समोर आले आहे. एकंदर कोरोनाकाळात २१ बाल विवाह रोखले गेले आहेत. एप्रिल २०२० मध्ये वसमत तालुक्यातील बोराळा येथे १, मे महिन्यात कळमनुरी तालुक्यातील धारधावंडा येथे २, वसमत तालुक्यातील सेलू येथे १, जूनमध्ये कळमनुरी शहरातील इंदिरानगर येथे १,वारंगा येथे १, जुलै महिन्यात कळमनुरी तालुुक्यातील महालिंगी येथे १, सप्टेंबरमध्ये कळमनुरी तालुक्यातील शिवनी खुर्द १, वसमत तालुक्यातील माळवटा येथे १, नोव्हेंबरमध्ये वसमत तालुक्यातील इंजनगाव येथे १, हिंगोली तालुक्यातील लोहगाव येथे १, पेडगाववाडी येथे १, डिसेंबरमध्ये हिंगोली तालुक्यातील कलगाव येथे १, फेब्रुवारी २०२१ मध्ये वसमत तालुक्यातील वाई येथे २, मार्चमध्ये वसमत तालुक्यातील दगडपिंपरी येथे १, सेलू येथे १, कळमनुरी तालुक्यातील सापळी येथे १, एप्रिलमध्ये हिंगोली तालुक्यातील येळी येथे १, मे महिन्यात वसमत तालुक्यातील गुंज येथे १, औंढा तालुक्यातील उमरा येथे १, कळमनुरी तालुक्यातील वारंगा येथे १, जूनमध्ये सेनगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे १, हाताळा येथे १, कळमनुरी तालुक्यातील शिंदगी येथे १ असे बाल विवाह रोखण्यात आले. यापैकी वारंगाफाटा, माळवटा आणि वाई येथील बाल विवाहावर गुन्हे दाखल करण्यात आले.

जुलै महिन्यात कळमनुरी तालुुक्यातील महालिंगी येथे १, सप्टेंबरमध्ये कळमनुरी तालुक्यातील शिवनी खुर्द १, वसमत तालुक्यातील माळवटा येथे १, नोव्हेंबरमध्ये वसमत तालुक्यातील इंजनगा १, हिंगोली तालुक्यातील लोहगाव येथे १, पेडगाववाडी येथे १, डिसेंबरमध्ये हिंगोली तालुक्यातील कलगाव येथे १, फेब्रुवारी २०२१ मध्ये वसमत तालुक्यातील वाई येथे २, मार्चमध्ये वसमत तालुक्यातील दगडपिंपरी येथे १, सेलू येथे १, कळमनुरी तालुक्यातील सापळी येथे १, एप्रिलमध्ये हिंगोली तालुक्यातील येळी येथे १, मे महिन्यात वसमत तालुक्यातील गुंज येथे १, औंढा तालुक्यातील उमरा येथे १, कळमनुरी तालुक्यातील वारंगा येथे १, जूनमध्ये सेनगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे १, हाताळा येथे १, कळमनुरी तालुक्यातील शिंदगी येथे १ असे बाल विवाह रोखण्यात आले. यापैकी वारंगाफाटा, माळवटा आणि वाई येथील बाल विवाहावर गुन्हे दाखल करण्यात आले.

शाळाबाह्य मुले-मुली जास्त...

बालविवाहामध्ये जास्त करुन शाळाबाह्य मुले-मुलीच आहेत. हा सर्व प्रकार गरीबी आणि आर्थिक विवंचणेतून होतो असेही तपासाअंतीम समोर आले आहे. बालविहाबाबत कोणाला माहिती कळाल्यास त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधावा.

माहिती कळाल्याबरोबर घेतली धाव...

कोरोना काळात बाल विवाह होणार असल्याची माहिती कळाली. लगेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. संबंधित बालकांच्या माता-पित्यांनाही यावेळी समज देण्यात आली. यापुढे असे प्रकार घडू देवू नका, अशीही सूचना दिली.

आर्थिक विवंचणेतून बालविवाह

आर्थिक विवंचणा हे प्रमुख कारण बाल विवाह होण्यासाठी कारणीभूत आहे. मागचा पुढचा विचार न करता ही मंडळी आपल्या मुला-मुलीचा विवाह करुन टाकतात. नंतर मात्र पश्चातापाला सामोरे जातात, एवढे मात्र नक्की.

प्रतिक्रिया

पालकांनी मुलींना जास्तीत जास्त शिक्षण दिले पाहिजे. मुलगी जर शिकली तर घराची प्रगती होते. बाल वयात मुलीच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षणामुळे मुलगी उच्चशिक्षीत होते.

-सरस्वती कोरडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी

जिल्ह्यात बाल विवाह होत असतील तर त्याची माहिती गावकऱ्यांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात द्यावी. यासाठी १०९८ असा टोल फ्री क्रमांक दिलेला आहे.

-विठ्ठल शिंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

Web Title: 21 child marriages prevented during Corona period; Two were charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.