२१२ शाळांनी दिले चुकीचे खातेक्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:04 AM2018-09-16T00:04:55+5:302018-09-16T00:05:11+5:30

शालेय पोषण आहार योजने अंतर्गत संबंधित २१२ शाळेतील मुख्याध्यापकांनी चूकीचे खातेक्रमांक शिक्षण विभागाकडे सादर केले. सदरील खातेक्रमांक तात्काळ दुरूस्ती करून सादर करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जोपर्यंत खातेक्रमांक बरोबर दिले जाणार नाहीत, तोपर्यंत शापोआ अंतर्गत दिली जाणारी रक्कम वर्ग केली जाणार नाही.

 212 Wrong account number provided by schools | २१२ शाळांनी दिले चुकीचे खातेक्रमांक

२१२ शाळांनी दिले चुकीचे खातेक्रमांक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शालेय पोषण आहार योजने अंतर्गत संबंधित २१२ शाळेतील मुख्याध्यापकांनी चूकीचे खातेक्रमांक शिक्षण विभागाकडे सादर केले. सदरील खातेक्रमांक तात्काळ दुरूस्ती करून सादर करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जोपर्यंत खातेक्रमांक बरोबर दिले जाणार नाहीत, तोपर्यंत शापोआ अंतर्गत दिली जाणारी रक्कम वर्ग केली जाणार नाही.
शासनाकडून जि. प. प्राथमिक व माध्यमिक शाळांतून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. योजने अंतर्गत संबधित शाळांना दिला जाणाºया खर्चाची रक्कम मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. परंतु जिल्ह्यातील चक्क २१२ शाळांनी शिक्षण विभागाकडे चूकीचे खातेक्रमांक दिले आहेत. खातेक्रमांक पडताळणी करताना हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे आता ज्या शाळेच्या संबधित मुख्याध्यापकांनी चूकीचे खातेक्रमांक दिले त्यांनी तत्काळ दुरूस्ती करून योग्य असलेले बँक खातेक्रमांक द्यावेत अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. शालेय पोषण आहार योजने अंतर्गत इंधन-भाजीपाला, स्वयंपाकी मतदनिसांचे मानधन यासह योजने अंतर्गत झालेला खर्च बँक खात्यावर वर्ग केला जातो. मात्र शिक्षण विभागाकडे संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी विविध त्रूट्या असलेले खातेक्रमांक सादर केल्याचे शापोआ विभागाकडून सांगण्यात आले. शिवाय बँक खातेक्रमांकात असलेल्या त्रुट्यांची पुर्तता, दुरूस्ती करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण २१२ शाळांतील मुख्याध्यापकांचे बँक खाते चूकीचे असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
शिक्षण विभाग : मानधनाअभावी गैरसोय
शालेय पोषण आहार अंतर्गत स्वयंपाकी मदतनिसांची मानधनाअभावी गैरसोय होत आहे. मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणीही आहे. परंतु आर्थिक व्यवहार हा बँकेमार्फत सुरू असल्याने अचूक खाते क्रमांक संबधित शाळांनी शिक्षण विभागाकडे देणे गरजेचे आहे.
जेणेकरून योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी अडचणी येणार नाहीत. परंतु शालेय पोषण आहार योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी यंत्रणेचे नियोजन नसते. त्यामुळे योजना राबविताना विविध समस्यां निर्माण होतात. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
शापोआ अंतर्गत दिलेल्या चूकीच्या खाते क्रमांकामुळे खर्च करण्यात आलेली रक्कम आता खात्यावर जमा होण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे तात्काळ त्रुट्यांची पुर्तता करण्याचे आवाहन करण्या आले आहे.

Web Title:  212 Wrong account number provided by schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.