हिंगोली जिल्ह्यात अवैध दारू विक्रीचे २१३ गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:26 AM2020-12-23T04:26:03+5:302020-12-23T04:26:03+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गावठी दारूविरोधात कारवाई केली जाते. मात्र, दुकाने तपासणीसह इतर कामांत व्यस्त राहणाऱ्या यंत्रणेला यात फारसे ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गावठी दारूविरोधात कारवाई केली जाते. मात्र, दुकाने तपासणीसह इतर कामांत व्यस्त राहणाऱ्या यंत्रणेला यात फारसे काम करण्याची संधी मिळत नाही. जर मिळालीच तर कारवाई केल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा हे अवैध दारू विक्री करणारे पुन्हा आपल्या कामाला लागतात, असा प्रकार घडतो. तरीही एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्बल २१३ गुन्हे दाखल केले आहेत. यातील सर्वाधिक ४८ गुन्हे हे ऑक्टोबर महिन्यात दाखल झालेले आहेत. यातील ११२ प्रकरणांत दारू बनविण्याच्या रसायन व इतर साहित्यासह आरोपींनाही अटक करण्यात यश आले आहे. यात एकूण १०८ जणांना अटक करण्यात आली होती, तर या सर्व प्रकरणांमध्ये १५ लाख ३९ हजार ७५८ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. मात्र, १०१ प्रकरणांत एकही आरोपी सापडला नाही. केवळ मुद्देमालच जप्त करण्याची वेळ आली. या बेवारस मालाचा वारस एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या प्रकरणात सापडला नाही, ही बाब मात्र काही प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. शिवाय अशा प्रकरणांचे प्रमाणही जवळपास ५० टक्के आहे.
महिनानिहाय दाखल गुन्हे
महिनावारसबेवारसआरोपीमुद्देमाल
एप्रिल ११ १७ ११ १
मे ६ १२ ६ ४.७
जून १२ ११ १२ ०.५५
जुलै १० १० १० ३.२३
ऑगस्ट १२ ११ ११ १.०
सप्टेंबर १३ १० १२ ०.४
ऑक्टोबर २९ १९ २८ २.६७
नोव्हेंबर १९ ११ १८ १.७५
एकूण ११२ १०१ १०८ १५.३९