वाहतुकीच्या दंडाचे २२.६९ लाख वसूल ; जिल्हा राज्यात पहिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:32 AM2021-09-26T04:32:06+5:302021-09-26T04:32:06+5:30
महाराष्ट्रात वाहतूक पोलीस विभागाचे अपर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांनी संपूर्ण महाराष्ट्रात वाहतूक पोलिसांनी केलेल्या अनपेड ( प्रलंबित ) ...
महाराष्ट्रात वाहतूक पोलीस विभागाचे अपर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांनी संपूर्ण महाराष्ट्रात वाहतूक पोलिसांनी केलेल्या अनपेड ( प्रलंबित ) केसेसचा निपटारा करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सूचना दिल्या होत्या. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी वाहतूक नियंत्रण शाखा हिंगोली यांना तसेच जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना सूचना दिल्या. अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस उपअधीक्षक ग्रामीण व्ही. टी.वाखारे यांचे मार्गदर्शनात हिंगोली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी आपल्या अधिनस्त पोलीस कर्मचारी किरण चव्हाण, शेषराव राठोड, रावसाहेब घुमणर, चंद्रकांत मोटे, फुलाजी सावळे, वसंत चव्हाण, रवी गंगावणे, गजानन राठोड, सुभाष घुगे, शिवाजी पारस्कर, गजानन सांगळे, रमेश ठोके, बळी शिंदे, तानाजी खोकले, अमित मोडक, महिला कर्मचारी सुषमा भाटेगावकर, भारती दळवे, वाहन चालक घुगे, काशिदे जैस्वाल यांनी विशेष मेहनत घेऊन ५४७५ केसेसचा निपटारा करून २२.६९ लाख प्रलंबित चलन वसूल केले आहे. या ठिकाणी विशेष बाब म्हणजे भौगोलिक आकाराने आणि तुलनेने कमी वाहनसंख्या असलेल्या आपल्या जिल्ह्यातील हिंगोली वाहतूक शाखेची कामगिरी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. याबाबत मा. विधी सेवा समिती अध्यक्ष तथा लोकन्यायालयाचे अध्यक्ष शिंदे यांनी वाहतूक शाखेच्या अंमलदार यांना बोलावून शाबासकी दिली आहे.
मोहीम अशीच सुरु राहणार
नागरिकांनी त्यांचे वाहनावरील प्रलंबित चलन वाहतूक शाखेत अथवा महाट्रॅफिक ॲपद्वारे भरून घ्यावे. तसेच वाहतुकीचे नियम पाळून नवीन चलन होणार नाही. याकडे लक्ष द्यावे, असे पोलीस अधीक्षक कलासागर यांनी केले.