२.३९ लाख घनमीटर गाळ काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:55 AM2018-04-13T00:55:42+5:302018-04-13T00:55:42+5:30
जिल्ह्यात लोकसहभागातून गाळ काढण्याच्या मोहिमेला यंदा सुरुवातीलाच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे पाण्याची उपलब्धता होत असून शेतीही सुपीक होत असल्याने नागरिक लोकसहभागातूनच ही कामे करण्यावर भर देत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात लोकसहभागातून गाळ काढण्याच्या मोहिमेला यंदा सुरुवातीलाच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे पाण्याची उपलब्धता होत असून शेतीही सुपीक होत असल्याने नागरिक लोकसहभागातूनच ही कामे करण्यावर भर देत आहेत.
यामध्ये सेनगाव तालुक्यात जि.प.च्या लघुसिंचन व सिंचन व्यवस्थापन उपविभाग क्र.३ यांच्या वतीने प्रत्येकी तीन तलावांतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. यात जि.प.तर्फे ३ तलावांतील ११ हजार ८00 घनमीटर गाळ लोकसहभागातून काढला व उर्वरित काम सुरू आहे. तर उपविभाग क्र.३ तर्फे ३ तलावांतील १ लाख २२ हजार १४८ गाळ लोकसहभागातून काढण्यात आला आहे. कळमनुरी तालुक्यातही याच दोन विभागांकडून तीन ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू आहे.
यात उपविभाग क्र. ३ ने दोन तलावांतून ४३ हजार ३५0 तर जि.प.ने एक तलावातून ६ हजार घनमीटर गाळ काढला. हिंगोलीत पशुपैदास केंद्राकडून एका तलावातील ३२६४ घनमीटर, जि.प.लघुसिंचनकडून एका तलावातील १0 हजार घनमीटर, तर उपविभाग क्र.३ कडून दोन तलावांतील ३८ हजार ३0४ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर औंढा तालुक्यात उपविभाग क्र.३ कडून दोन तलावांतील ४३४७ घनमीटर गाळ काढला आहे. एकूण २.३९ लाख घनमीटर गाळ काढण्याचे काम झाले आहे. तर अजूनही अनेक नवीन कामे होणार आहेत.
गाळ काढण्याच्या कामासाठी ३४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १८ कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. तर १३ कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यंदा लोकसहभाग वाढला आहे.