२३ जणांना मिळाली पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:06 PM2018-10-12T23:06:46+5:302018-10-12T23:07:39+5:30
महसूल विभागातील तलाठी व लिपिक संवर्गाच्या पदोन्नत्यांचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. यामध्ये २३ जणांना लाभ मिळाला असून नव्या ठिकाणी रुजू होण्यास आदेशित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महसूल विभागातील तलाठी व लिपिक संवर्गाच्या पदोन्नत्यांचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. यामध्ये २३ जणांना लाभ मिळाला असून नव्या ठिकाणी रुजू होण्यास आदेशित केले आहे.
मंडळ अधिकारीपदी पदोन्नती मिळालेल्यांना नवीन ठिकाण दिले आहे. यात सेनगाव तहसीलमधील तलाठी एस.आर. बोडखे यांना पदोन्नतीवर आजेगावचे मंडळ अधिकारी, हिंगोलीचे जी.एस. पारिसकर नर्सी नामदेव, के.एन. पोटे यांना माळहिवरा, सदाशिव बापूराव देशमुख यांना बासंबा, वसमत तहसीलचे धोंडिबा श्रीपतराव खोकले हट्टा, आशा किशनराव गिते यांना आंबा, एस.जी. राऊत यांना टेंभूर्णी, कळमनुरी तहसीलचे तलाठी यू.आर.डाखोरे कळमनुरी, औंढा तहसीलचे जी.एन. कुलकर्णी येहळेगाव सोळंके, वैजनाथ विनायक मुंढे यांना साळणा, हनुमंत सोपान मुंढे यांना हिंगोलीतील खांबाळा, शिदिगंबर फुलाजी गारोळे यांना कळमनुरीतील डोंगरकडा येथे मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे.
लिपिकांनाही अव्वल कारकून पदावर पदोन्नती दिली असून यामध्ये ११ जणांचा समावेश आहे. यात कळमनुरी तहसीलचे पी.बी. राठोड यांना तेथेच, जिल्हा कचेरीतील एस.के. इंगोले यांना भूसंपादनमध्ये, वसमत तहसीलच्या एस.ओ. भागवत यांना जिल्हा कचेरीत, जिल्हा कचेरीतील लिपिक आर.एन.पाठक यांना उपविभाग हिंगोलीत, वसमत तहसीलचे शे.एजाज शे. मुनीर यांना तेथेच, कळमनुरीचे प्रकाश धोंडिबा म्हेत्रे यांना हिंगोली तहसील, कळमनुरीच्या श्रीमती रंगारी यांना जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, सेनगावचे विनोदकुमार भिवाजी अंभोरे यांनाही पुरवठा विभाग, वसमतचे माधव बी.वाडीकर यांना तेथेच, वसमतचे भारत खडसे यांना हिंगोली तहसील, जिल्हा कचेरीतील संतोषसिंह मन्नुसिंह ठाकूर यांना तेथेच महसूलमध्ये अव्वल कारकून म्हणून पदोन्नती दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा कचेरीत पदोन्नत्यांबाबत चर्चा होती. जिल्हाधिकाºयांनी दसºयापूर्वीच कर्मचाºयांना ही भेट दिली. यासाठी आस्थापना विभागाने घेतलेली मेहनत कर्मचाºयांना लाभदायी ठरली. आज अनेकांनी आपला नवीन पदभारही स्वीकारल्याचे दिसले.