हिंगोली जिल्ह्यातून कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत २३३ लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 06:51 PM2020-02-25T18:51:48+5:302020-02-25T18:53:44+5:30

हिंगोली तालुक्यातील समगा आणि खरबी या दोन गावांचा पहिल्या यादीत समावेश आहे.

233 beneficiaries in the first list in debt relief scheme from Hingoli district | हिंगोली जिल्ह्यातून कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत २३३ लाभार्थी

हिंगोली जिल्ह्यातून कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत २३३ लाभार्थी

googlenewsNext
ठळक मुद्देमहात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना

हिंगोली : कर्जमुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांची सोमवारी पहिली यादी जाहिर करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून दोन गावे २४ फेब्रुवारी निवडली जाणार होती. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची यादी जाहिर करण्यात आली असून यामध्ये हिंगोली तालुक्यातील समगा आणि खरबी या दोन गावांचा पहिल्या यादीत समावेश आहे. एकूण २३३ लाभार्थ्यांची नावे पहिल्या यादीत आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु आहे. सदर योजने अंतर्गत आजपर्यंत १ लाख ५ हजार ६९० शेतकऱ्यांचे कर्जखात्याशी आधार जोडणी झालेली आहे. त्यापैकी ९६ हजार ९९५ शेतकऱ्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. अद्याप ३ हजार ५०० शेतकऱ्यांनी आपले आधार ओळखपत्र आणून न दिल्याने त्यांची आधार जोडणीचे काम प्रलंबीत आहे. आधार जोडणीचे काम शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी विनाविलंब त्यांचे आधार ओळखपत्र संबंधीत बँक शाखेत देवून आधार जोडणीचे काम पुर्ण करावे असे आवाहन जिल्हास्तरीय समितीने केले आहे.

योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत पायलट प्रमाणिकरणासाठी हिंगोली तालुक्यातील मौजे समगा व खरबी या दोन गावांची निवड केली होती. मौजे समगा गावातील १४७ तर खरबी येथील ८६ असे एकूण २३३ लाभार्थ्यांची यादी सोमवारी संबंधीत गावात प्रसिध्द केली. त्यानंतर या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणांचे काम सुरुळीतपणे सुरु झाले आहे. समगा व खांबाळा येथील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत बायोमेट्रिक यंत्राद्वारे हे आधार प्रमाणिकरणाचे काम करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण नोंद पावती देवून सोमवारी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार, तहसिलदार खंडागळे, सहाय्यक निबंधक जितेंद्र भालेराव आदी उपस्थितत होते. 

जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली भेट
कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहिर झाली. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी समगा याठिकाणी भेट देऊन प्रत्येक्ष पाहणी केली. यावेळी आपले सरकार सेवा केंद्रावरील कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत आवश्यक सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तर समगा व खरबी याठिकाणी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे व जिल्हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार यांनीही भेटी देऊन पाहणी केली.४२३३ लाभार्थ्यांची बँक निहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. यात हिंगोली तालुक्यातील समगा गावातील महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत अलाहाबाद बँक -१, बँक आॅफ इंडिया-२८, स्टेट बँक आॅफ इंडिया-२२, युनियन बँक आॅफ इंडिया-९६ असे एकूण १४७ लाभार्थी शेतकरी तर खरबी येथील बँक आॅफ बडोदा या बँकेमध्ये एकूण ८६ लाभार्थी शेतकरी आहेत.

Web Title: 233 beneficiaries in the first list in debt relief scheme from Hingoli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.