१० हजारांच्या अनुदानावर मिळणार २३३ पंपसंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:50 AM2018-07-15T00:50:44+5:302018-07-15T00:50:56+5:30
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व राष्टÑीय गळितधान्य व तेलताड अभियानांतर्गत सन २०१८- १९ साठी १० हजार रुपयांच्या अनुदानावर योजनेच्या निकषपात्र शेतकऱ्यांना २३३ पंपसच मिळणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयाच्या वतीने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व राष्टÑीय गळितधान्य व तेलताड अभियानांतर्गत सन २०१८- १९ साठी १० हजार रुपयांच्या अनुदानावर योजनेच्या निकषपात्र शेतकऱ्यांना २३३ पंपसच मिळणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयाच्या वतीने केले आहे.
हिंगोली जिल्ह्यासाठी फ्लेक्झी निधी बाबीअंतर्गत उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यामध्ये १० हजारांपर्यंत अनुदानावर १६ तुषार संच २३३ कृषीपंप संच वितरित केले जाणार आहेत. तर एफ.पी.ओ.साठी गोदाम बांधकाम करण्यास बँक कर्ज मंजूर झाल्यास १२.५0 लाखांपर्यंत अनुदान देता येणार आहे. हे दोन प्रस्ताव मंजूर करता येतील. याच धर्तीवर एफ.पी.ओ.साठी बिजप्रक्रिया संयंत्र एका प्रस्तावाचे उद्दिष्ट असून १0 लाखांपर्यंत अनुदान आहे. सन २०१८- १९ मध्ये राष्टÑीय गळीतधान्य व तेलताड अभियानांतर्गत ४० ते ५० रुपये प्रतिमीटर पाईपच्या खर्चाच्या ५० टक्के मर्यादेत ४९ हजार २०० मीटर पाईप, तर साडेबारा लाख बँक कर्जाशी निगडीत ३४. ७७ लक्ष फ्लेक्सी निधी अंतर्गत एफ. पी.ओेसाठी गोदाम बांधकाम, २० बाय २० बाय ३ आणि ३० बाय ३० बाय ३ शेततळे यात निकषाप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे. इच्छुकांनी ३० जुलैपर्यंत विहित प्रपत्रामध्ये अर्ज संबंधित कृषी सहायक अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे सादर करावे.
बँकेकडे प्रस्ताव दाखल करावा
४गोदाम बांधकाम व बिजप्रक्रिया सयंत्र ही बाब बँक कर्जाशी निगडीत असल्याने, इच्छुक शेतकरी उत्पादक संघ,कंपनी, एफ. पी. ओ, एफ. पी. ओ यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भांडार योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनानुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी सदर बाबीच्या लाभास पात्र राहणार आहे.