२३४ बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:19 AM2018-08-11T00:19:59+5:302018-08-11T00:20:27+5:30

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबविला जातो. त्या अनुषंगाने जिल्ह्यात मागील पाच वर्षांत केलेल्या आरोग्य तपासणीत हृदयरोग आढळून आलेल्या २३४ बालकांची मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. यात अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 234 Free Heart Surgery of Babies | २३४ बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया

२३४ बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबविला जातो. त्या अनुषंगाने जिल्ह्यात मागील पाच वर्षांत केलेल्या आरोग्य तपासणीत हृदयरोग आढळून आलेल्या २३४ बालकांची मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. यात अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
निरोगी व सदृढ पिढी घडविण्यासाठी शासनाकडून राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमात ० ते ६ वयोगटाच्या अंगणवाडीतील चिमुकल्यांची तर शाळेतील ६ ते १८ वयोगटाच्या शालेय बालकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते. तपासणीत आढळून आलेल्या बालकांची मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार केले जातात. आरोग्य विभागाच्या १७ वैद्यकीय पथकांद्वारे मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येते. बालकांना औषधोपचाराबाबत पालकांना मार्गदर्शन केले जाते.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या सूचना
राष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम अंतर्गत कागपत्राअभावी येणाºया अडचणींकडे लक्ष द्यावे. तसेच गरजूंना शिधापत्रिका तत्काळ वाटप केल्या जाव्यात याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी संबधित तहसीलदारांना सूचनाही दिल्या होत्या. त्यामुळे बालकांवर आरबीएसकेअंतर्गत उपचार करताना संबधित बालकांच्या पालकांना मदत झाली. शिवाय कागदपत्रांची जुळवणी करतानाही अडचणींचा सामना करावा लागला नाही.
पालकांना आवाहन
राष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रीयेसाठी जिल्हा रूग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सीएस श्रीवास, डॉ. गोपाल कदम यांनी केले.

Web Title:  234 Free Heart Surgery of Babies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.