कोरोनाचे नवे २३४ रुग्ण, २२९ जण झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:48 AM2021-05-05T04:48:30+5:302021-05-05T04:48:30+5:30

जिल्ह्यात आजपर्यंत कोविडचे एकूण १३ हजार ४२१ रुग्ण झाले असून, त्यापैकी ११ हजार ८३८ रुग्ण बरे ...

234 new corona patients, 229 healed | कोरोनाचे नवे २३४ रुग्ण, २२९ जण झाले बरे

कोरोनाचे नवे २३४ रुग्ण, २२९ जण झाले बरे

Next

जिल्ह्यात आजपर्यंत कोविडचे एकूण १३ हजार ४२१ रुग्ण झाले असून, त्यापैकी ११ हजार ८३८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजघडीला जिल्ह्यात एकूण १३३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वाॅर्डमध्ये भरती असलेल्या कोविड रुग्णांपैकी ४२४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे. तर ४२ कोविड रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण ४६६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून, तज्ज्ञ डॉक्टरमार्फत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दोघांचा मृत्यू

आज हिंगोली येथील आयसोलेशन वाॅर्डात दाखल पिंपरी येथील ६५ वर्षीय पुरुष व औंढा नागनाथ तालुक्यातील उंडेगाव येथील ४० वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत २४५ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

Web Title: 234 new corona patients, 229 healed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.