२३८२ अपूर्ण कामे झाली आहेत पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:05 AM2019-03-14T00:05:12+5:302019-03-14T00:05:56+5:30
मग्रारोहयोत अपूर्ण कामांची वाढत चाललेली संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिलेल्या उद्दिष्टानुसार काम झाल्याने यात २३८२ अपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. आता नव्याने १0७८ कामांचे उद्दिष्ट दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मग्रारोहयोत अपूर्ण कामांची वाढत चाललेली संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिलेल्या उद्दिष्टानुसार काम झाल्याने यात २३८२ अपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. आता नव्याने १0७८ कामांचे उद्दिष्ट दिले आहे.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रोहयोच्या कामांचा आज आढावा घेतला. मागील तीन महिन्यांत २३८२ अपूर्ण कामे पूर्ण केल्याने यंत्रणांचे कौतुक केले. मागील आठवडाभरात ७२ कामे झाली. यात कृषी १९, वन विभाग १५, ग्रा.पं.ची १८, लघुपाटबंधारे जि.प. १, सा.बां.-१, रेशीम विभागाची १४ कामे आहेत.
अखर्चित निधीमुळे पुढील निधी मिळत नसल्याने यावर मात्र सर्वच बीडीओंनी २४ तासांत सुधारणा न केल्यास कारणे दाखवा देण्याचा इशारा दिला. यामध्ये ३१ लाख ४८ हजार जमा केले. मात्र त्याचे विवरण दिले नाही. तर २२.९0 लाख जमा करणे बाकी आहे. सिंचन विहिरींचा प्रश्न अजूनही लटकलेलाच आहे. ५६९५ विहिरींना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. तर ३४९0 विहिरींची कामे सुरू आहेत. २२0५ विहिरींची सर्व प्रक्रिया झालेली असल्याने ही कामे सुरू करण्यास कोणतीच अडचण नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत केवळ ५७६ विहिरींची कामे पूर्ण झालेली आहेत. ही संख्या वाढण्यासाठी कामांना गती देण्याची सूचनाही त्यांनी दिली.
मग्रारोहयोच्या कामांवरील मजुरांना वेळेत मजुरी मिळण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न वाढविण्यास सांगितले. ८६.७७ टक्के मजुरी वेळेत मिळाली आहे. मात्र उर्वरित विलंबासाठी संबंधित अधिकारी कर्मचाºयांच्या पगारातून विलंब शुल्क वसूल करा. त्यासाठी कोषागारास पत्र देवून विलंब शुल्काशिवाय पगार करू नये, असे आदेशित करण्यासही सांगितले आहे.
पालकमंत्री पाणंद योजनेला गती
हिंगोली जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद योजनेची कामे ठप्प होती. यासाठीचे दीड कोटी पडून होते. लोकमतमध्ये प्रकाशित वृत्ताची दखल घेत १५0 कामांना मंजुरी दिली आहे. तर यात १५ लाखांचा खर्च झाला आहे. तर १0 कामे पूर्ण झाली आहेत. ३२ कामे सुरू झाली आहेत. यात औंढा १0, वसमत ३, हिंगोली २, कळमनुरी १२ व सेनगावात ५ कामे सुरू झाली आहेत.