२४ बालकांना काढले कुपोषणातून बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:07 AM2018-08-12T00:07:26+5:302018-08-12T00:08:08+5:30
महिला व बालकलयाण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या २५१ ग्राम बालविकास केंद्रात दाखल ४४४ तीव्र कुपोषितांपैकी २२३ बालकाचे वजन वाढले आहे. तर २४ बालके कुपोषणातून बाहेर पडली आहेत. जवळपास एक महिन्यात बालकांमध्ये ही सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. मागील अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधी कुपोषणाच्या मुद्यावर प्रशासनाला धारेवर धरत होते. हा भाग आदिवासीबहुल व मागास आहे. ग्रामीण भागात परिस्थिती अतिशय बिकट आहे. अनेक मुलांना योग्य पोषण आहार व आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महिला व बालकलयाण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या २५१ ग्राम बालविकास केंद्रात दाखल ४४४ तीव्र कुपोषितांपैकी २२३ बालकाचे वजन वाढले आहे. तर २४ बालके कुपोषणातून बाहेर पडली आहेत. जवळपास एक महिन्यात बालकांमध्ये ही सुधारणा झाली आहे.
जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. मागील अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधी कुपोषणाच्या मुद्यावर प्रशासनाला धारेवर धरत होते. हा भाग आदिवासीबहुल व मागास आहे. ग्रामीण भागात परिस्थिती अतिशय बिकट आहे. अनेक मुलांना योग्य पोषण आहार व आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागामार्फत बाल ग्रामविकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला होता. यासाठी १0८९ अंगणवाड्यांमधून सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ४४४ बालके कुपोषित आढळली होती.त्यांना बालकविकास केंद्रात दाखल करण्यात आले. जिल्ह्यातील सहा प्रकल्पांअंतर्गत बालविकास केंद्रात दाखल प्रकल्पनिहाय मुले हिंगोली -६१, वसमत १३४, कळमनुरी २३, आखाडा बाळापूर २६, औंढा नागनाथ १०९, सेनगाव ९१ असे चित्र आहे. या बालकांना दिवसातून आठवेळा पोषण आहार व आरोग्य सेवा दिली जात आहे. यापैकी २४ बालकांना कुपोषणाबाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये हिंगोली-४, वसमत-१५, औंढा-३ व सेनगाव २ अशी प्रकल्पनिहाय संख्या आहे. कळमनुरी व औंढ्यात अजून एकही बालक कुपोषणाबाहेर आले नाही.
२२३ बालके कमी कुपोषित गटात आली आहेत. यामध्ये हिंगोली-२५, वसमत-७५, कळमनुरी-१४, आखाडा बाळापूर-९, औंढा नागनाथ-६0 व सेनगावातील ४0 बालके आहेत.
एका महिन्यात श्रेणीवर्धनाचे आव्हान
बालविकास केंद्र आणखी महिनाभर सुरू राहणार आहेत. या काळात सर्वच बालके सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणण्याचे आव्हान आगंणवाडीताई, मदतनीस, पर्यवेक्षिकांना पेलावे लागणार आहे. ही बालके कुपोषणाबाहेर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी दिल्या.
या बालविकास केंद्रांमध्ये तीव्र कुपोषित बालकाला पूरक पोषण आहार दिला जातो.या आहारमध्ये दूध,केळी, अंडी असे पोषण आहार दिले जाते. त्याच बरोबर वेगवेगळया लसीकरण सुध्दा दिल्या जाते. तसेच यादरम्यान त्याला आरोग्यविषयक समस्या असल्यास त्यावर उपचारही केले जातात.
त्यामुळे या केंद्रामध्ये कुपोषित बालकांचे श्रेणीवर्धन होण्यास मदत होते. तर बालकांना घरीही योग्य प्रकारचा आहार मिळण्यासाठी त्यांच्या पालकांना जागरुक केले जात आहे. ही बालके पुन्हा कुपोषणाच्या गर्तेत सापडू नये, याची काळजी घेतली जात आहे.
या उपक्रमावर जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जि.प. सीईओ एच.पी.तुम्मोड, महिला व बालकल्याणच्या सभापती रेणूका जाधव लक्ष ठेवून आहेत. यातील काहींनी केंद्रांना भेटीही दिल्या.