कोरोनाचे नव्याने २६ रुग्ण; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:59+5:302021-06-11T04:20:59+5:30
जिल्ह्यात ४९३ जणांची रॅपिड ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली असता यात चार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यात हिंगोली परिसरात ...
जिल्ह्यात ४९३ जणांची रॅपिड ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली असता यात चार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यात हिंगोली परिसरात ३७ पैकी १, वसमत १३८ पैकी २, सेनगाव ४५ पैकी ०, औंढा २३४ पैकी १, तर कळमनुरी परिसरात ३९ जणांची तपासणी केली असता एकही रुग्ण आढळून आला नाही. आरटीपीसीआर टेस्टमध्ये जिल्ह्यात २२ रुग्ण आढळले आहेत. यात वसमत परिसरात ९३ जणांची तपासणी केली असता डिग्रस २, समगा १, हिंगोली १, सानोळी १, खेर्डा १, सरस्वतीनगर १, पळसोना २, डिग्रस कऱ्हाळे १, वंजारवाडा १ असे ११ रुग्ण आढळून आले. वसमत परिसरात २६७ जणांची तपासणी केली असता एकही रुग्ण आढळला नाही. कळमनुरी परिसरात ७४ जणांची तपासणी केली असता एसएसबी येलकी येथे १ रुग्ण आढळला. औंढा परिसरात ७२ पैकी टाक १, औंढा १, रूपूर १ असे तीन रुग्ण आढळले. दरम्यान, गुरुवारी ३३ जण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यात जिल्हा रुग्णालयातील २२, सेनगाव २, लिंबाळा ८, तर सिद्धेश्वर औंढा येथील एका बऱ्या झालेल्या रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत जिल्ह्यात १५ हजार ८५२ रुग्ण आढळले असून, त्यांपैकी १५ हजार ३५१ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला १२९ रुग्णांवर उपचार सुरू असून ४५ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे; तर १० रुग्णांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.
आतापर्यंत ३७२ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ३७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी हिंगोली येथील आयसोलेशन वाॅर्डात उपचार घेणाऱ्या दगडधानोरा (ता. पुसद) येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला.