सिंचन विहिरींची २७३३ कामेच पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:30 AM2021-09-19T04:30:39+5:302021-09-19T04:30:39+5:30

हिंगोली जिल्ह्यात मग्रारोहयोत सिंचन विहिरी ७७४८, व्हर्मी कंपोस्ट २०, तुती लागवड ७४८, फळबाग लागवड १६२८, शेततळे ४०७, शोषखड्डे ४८२, ...

2733 works of irrigation wells completed | सिंचन विहिरींची २७३३ कामेच पूर्ण

सिंचन विहिरींची २७३३ कामेच पूर्ण

Next

हिंगोली जिल्ह्यात मग्रारोहयोत सिंचन विहिरी ७७४८, व्हर्मी कंपोस्ट २०, तुती लागवड ७४८, फळबाग लागवड १६२८, शेततळे ४०७, शोषखड्डे ४८२, नाडेप कंपोस्ट ७०, रोपवाटिका १०२, बांधावरील वृक्षलागवड ११८, सार्वजनिक विहिरी ६१८, तर घरकुलाची ४६१५ कामे प्रस्तावित होती. मात्र, या सर्व कामांपैकी केवळ २२१० पूर्ण झाले.

वैयक्तिक सिंचन विहिरींच्या कामांना सर्वाधिक माग्णी आहे. यात १० हजारांचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत ७४७१ कामांनाच प्रशासकीय मान्यता दिली. त्यापैकी ३४६१ प्रगतीत असून २८१२ कामे मागील तीन वर्षांत पूर्ण झाली. सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरींची तब्बल ६०० चे उद्दिष्ट असताना ६१८ कामे मंजूर केली होती. यापैकी ५२९ कामे सुरू असून १०९ कामे पूर्णत्वात आहेत. यासाठीचा कुशलचा निधी मिळत नसल्याची ओरड कायम आहे. जवळपास ६० कोटी रुपये रखडलेले असल्याचे सांगितले जाते.

४८.४७ कोटींचा खर्च

मग्रारोहयोत सिंचन विहिरींवर २९.१५ कोटी, तुती लागवडीवर १.३९ कोटी, फळबाग लागवडीवर २.७४ कोटी, रोपवाटिकांवर ४.१० कोटी, बांधावरील वृक्षलागवडीसाठी ७९.९५ लाख, सार्वजनिक विहिरींवर ८.२९ कोटी, घरकुलांवर १.९५ कोटी असा एकूण ४८.४७ कोटींचा खर्च झाला आहे.

१५१ कामे प्रस्तावित

हिंगोली जिल्ह्यात मग्रारोहयोअंतर्गत जिल्ह्याच्या परिवर्तनासाठी म्हणून १५१ कामे प्रस्तावित केली. यात पांदण रस्ते २८, नाला सरळीकरण १, विहीर पुनर्भरण ११, व्हर्मी कंपोस्ट ११, जनावरांसाठी गोठा १०० या कामांचा समावेश आहे. यावर ३.११ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Web Title: 2733 works of irrigation wells completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.