गतवर्षी केल्या २७७ यशस्वी केल्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:21 AM2021-07-10T04:21:24+5:302021-07-10T04:21:24+5:30
हिंगोली : गरोदरपणात कोणतीही इजा न होता गतवर्षी २७७ शस्त्रक्रिया यशस्वी केल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. दरवर्षी ...
हिंगोली : गरोदरपणात कोणतीही इजा न होता गतवर्षी २७७ शस्त्रक्रिया यशस्वी केल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.
दरवर्षी जगभरात १० जुलै हा दिवस ‘मातृ सुरक्षा दिन’ म्हणून साजरा केला जातो. जागितक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) २००५ पासून हा दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. गरोदरपणाच्या कालावधीत होणाऱ्या मृत्युदरात वाढ होऊ नये यासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि यावर उपाययोजना करण्याची गरज जाणण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. गर्भवती मातांची योग्य काळजी आणि त्यांच्या आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी मातृ सुरक्षा दिन साजरा केला जातो. आई मुलांची काळजी घेते आणि त्यांचे पालन करते. परंतु स्वत:ची काळजी करण्याचे ती विसरुन जाते. अशा परिस्थितीत आईच्या आरोग्याची काळजी करणे आपले कर्तव्य आहे. मातांचे आरोग्य जपणे हेही महत्त्वाचे आहे. दरवर्षी ‘मदर्स डे’ उत्साहात साजरा केला जातो. पण सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्यासाठी १० जुलै हा महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी जगभरात मातृत्व सुरक्षा दिन साजरा केला जातो.
कोरोना महामारीच्या काळात जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया शासनाच्या आदेशानुसार तात्पुरत्या स्वरूपात शस्त्रक्रिया स्थगित करण्यात आल्या होत्या. आठ-पंधरा दिवसांपासून नियमितपणे शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत.
२०२०-२१ या वर्षात एप्रिल ते मार्च या कालावधीत मिनीलॅप पीएल १८५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याचबरोबर ९२ दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. महिलांच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी २०२०-२१ मध्ये ८ शिबिरे तर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेसाठी ४ शिबिरे घेण्यात आयोजित करण्यात आली होती. दरवर्षी मातृ सुरक्षा दिन समोर ठेवून गरोदर मातांची काळजी घेतली जाते. गतवर्षी गरोदरपणाच्या गुंतागुंतीमुळे एका महिलेचा प्रसूतीदरम्यान तर दोन महिलांचा प्रसूती पश्चात मृत्यू झाला.
वेळेच्यावेळी गरोदरमातांनी तपासणी करावी
गरोदरपणामध्ये मातांनी तपासणीबाबत निष्काळजीपणा करू नये. वेळेच्यावेळी फॅमिली डॉक्टरांना दाखवावे. गरोदारपणात मातांनी घरचा उपाय न करता स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
-डॉ. रमेश कुटे, स्त्रीरोग तज्ज्ञ