२८ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:56 PM2018-12-25T23:56:55+5:302018-12-25T23:57:13+5:30
देशाची भावी पिढी निरोगी व सुदृढ बनावी या उद्देशाने जिल्ह्यात राष्टÑीय बालस्वास्थ्य कार्यक्रम राबविला जातो. २०१८-१९ या वर्षात सदर कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वयोगटातील २८ बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. तर इतर १६२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाचा हा उपक्रम बालकांसाठी संजीवनी ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : देशाची भावी पिढी निरोगी व सुदृढ बनावी या उद्देशाने जिल्ह्यात राष्टÑीय बालस्वास्थ्य कार्यक्रम राबविला जातो. २०१८-१९ या वर्षात सदर कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वयोगटातील २८ बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. तर इतर १६२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाचा हा उपक्रम बालकांसाठी संजीवनी ठरत आहे.
राष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम दरवर्षी राबविला जातो. शाळा व अंगणवाडीतील ० ते १८ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केली जाते. ३८ प्रकारच्या दुर्धर आजारापासून बालकांचा बचाव व्हावा; यासाठी राष्टÑीय कार्यक्रमा अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून बालकांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केली जाते. वर्षातून एकदा शाळेतील तर दोनदा अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येते. जानेवारी, फेबु्रवारी आणि मार्च या उर्वरित तीन महिन्यांत बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. जिल्हाभरातील शाळा व अंगणवाडी राष्टÑीय बालस्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली.
जिल्हाभरातील आरोग्य तपासणीची आकडेवारी
जिल्ह्यातील ११८७ अंगणवाड्यांतील १ लाख १८ हजार ६३ बालकांपैकी १ लाख ६ हजार ९९५ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्य तपासणीचे ९१ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित तपासणी पुढील तीन महिन्यात होणार आहे.
तसेच जिल्ह्यातील ११०२ शाळेतील २ लाख १२ हजार ३१८ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ४ हजार ४६१ बालाकांची आरोग्य तपासणी करण्यासत आली. आरोग्य तपासणीत दुर्धर आजार आढळुन आलेल्या बालकांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
० ते १८ वयोगटातील बालकांना दुर्धर आजार असल्यास मोफत उपचारासाठी जिल्हा रूग्णालयातील लक्ष्मण गाभणे दूरध्वनी क्रमांक ९९२११२७७०६, तसेच ज्ञानेश्वर चव्हाण ९८५०२७३६३० वर संपर्क करावा.
२८ बालकांची हृदय तर इतर १६२ शस्त्रक्रिया
राष्टÑीय बालस्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीत ४६ बालकांना हृदयाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील २८ बालकांची हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर शस्त्रक्रीया तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत बाहेरील जिल्ह्यात करण्यात आली. तसेच उर्वरित बालकांचीही शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच इतर आजारांमध्ये हाडाचे आजार असलेल्या २२ बालकांची शस्त्रक्रिया केली. १३ बालकांचे हर्नियाचे आॅपरेशन तर हॅड्रोसिल २२, अपेंन्डिक्स २२, जन्मजात मोतीबिंदू १, दातांचे ४० तसेच कान, नाक व घसा आजार असलेल्या २२ बालकांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. दुर्धर आजार असलेल्या बालकांवर राष्टÑीय बालस्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी संबधित पालकांनी जिल्हा रूग्णालयाशी संपर्क करण्याचे आवाहन निवासी वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ज्ञ डॉ. गोपाल कदम यांनी केले .