काळ्या बाजारात जाणारा रेशनचा २८५ क्विंटल तांदूळ पकडला

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: September 8, 2023 05:45 PM2023-09-08T17:45:41+5:302023-09-08T17:45:57+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; चौघांवर गुन्हा दाखल

285 quintals of ration rice going to black market caught by police | काळ्या बाजारात जाणारा रेशनचा २८५ क्विंटल तांदूळ पकडला

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा २८५ क्विंटल तांदूळ पकडला

googlenewsNext

हिंगोली : एका १४ चाकी ट्रकमधून काळ्या बाजारात नेला जाणारा रेशनचा २८५ क्विंटल तांदूळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. ही कारवाई ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी चौघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. 

हिंगोली ते औंढा रोडवरून एका १४ चाकी ट्रकमधून रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात नेला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालीहोती. त्यावरून पोलिस उप निरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या पथकाने औंढा रोडवरील एका पेट्रोल पंपासमोर एका ट्रकला थांबवून आतमध्ये तपासणी केली असता नायलॉनच्या पोत्यामध्ये तांदूळ आढळून आला. या बाबत चालकास विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे हा तांदूळ रेशनचा असल्याची खात्री पोलिसांना झाली.

ट्रकमध्ये ५ लाख ७० हजार रूपये किमतीचा २८५ क्विंटल तांदूळ असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी २० लाख रूपये किमतीचा ट्रक व तांदूळअसा एकूण २५ लाख ७० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस उप निरीक्षक विक्रम विठु    बोने यांच्या फिर्यादीवरून बलजिंदरसिंग गुरदीतसिंग (ट्रक चालक रा. दशमेश नगर बाफना नांदेड), फेरोजखान अहेमदखॉन पठाण (रा. पलटन हिंगोली), रऊफ खॉ युनुस खॉ (रा. पलटन हिंगोली), शेख सत्तार सहारा ट्रेडर्स (रा. वसमत) यांचेविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलिस उप निरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार सुनील अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले यांच्या पथकाने केली. 

ट्रकवर एक पासिंग नंबर तर कॅबिनमध्ये दुसरीच पाटी
पोलिसांनी ट्रक पकडल्यानंतर त्यावर एमएच २६ बीई २२८८ हा आरटीओ पासिंग क्रमांक असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ट्रकच्या कॅबिनमध्ये तपासणी केली असता कॅबिनमध्ये एमएच २६ बीई २१८८ अशी आरटीओ पासिंग  क्रमांकाची पाटी आढळून आली. दरम्यान, जिल्ह्यात रेशनचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे या कारवाईवरून समोरआले आहे. या पूर्वीही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून रेशनचा माल जप्त केला होता.

Web Title: 285 quintals of ration rice going to black market caught by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.