२९ हजार हेक्टर रबीचे नुकसान

By admin | Published: March 4, 2015 03:40 PM2015-03-04T15:40:33+5:302015-03-04T15:40:33+5:30

खरीप /हंगाम वाया गेल्यानंतर रबीवर उरलेल्या आशाही अवकाळी पावसाने मावळल्या.

29 thousand hectare loss of Rabi | २९ हजार हेक्टर रबीचे नुकसान

२९ हजार हेक्टर रबीचे नुकसान

Next

 हिंगोली : /खरीप /हंगाम वाया गेल्यानंतर रबीवर उरलेल्या आशाही अवकाळी पावसाने मावळल्या. ५0 टक्क्यांच्या आत ५५ पैकी २९ हजार ८१३ हेक्टरवर हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला. गतवर्षी गारपिटीने घाला घातला होता. 
जिल्ह्यात १ लाख २६ हजार २१0 पैकी ५५ हजार ५७0 हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. प्रमुख पीक असलेल्या हरभर्‍याची काढणी सुरू होती. एकूण पिकांपैकी ६0 टक्क्यांवर असलेला हरभरा अनेक ठिकाणी भुईसपाट झाला. कापलेल्या ठिकाणी तर मोड फुटण्याची वेळ आली. ज्वारी आणि गव्हाची अवस्था सारखीच झाली. दाणे धरल्यामुळे दोन्ही पिके काळी पडून नुकसानीत अधिक वाढ झाली. दोन्ही पिके झोपली असल्याने अन्नद्रव्य शेंड्यापर्यंत पोहोचणार नाहीत. परिणामी, दाणे भरणार नाहीत आणि काळवंडणारही आहेत. करडई, सुर्यफूल इतर पिकांनाही मोठा फटका बसला. पिके अंतिम टप्प्यात असताना सलग दुसर्‍यावर्षी पावसाने घाला घातला. मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. जिल्ह्याधिकार्‍यांनी महसूल आणि कृषी विभागाला सूचना दिल्या. त्यानुसार जिल्ह्यात फळ आणि इतर पिके मिळून २९ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज काढला. प्रामुख्याने कळमनुरी आणि हिंगोली तालुक्यात सर्वाधिक नुकसानीला सामोरे जावे लागले. औंढा आणि सेनगाव तालुक्यात अनुक्रमे ७८३३ आणि ६0१२ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला असला तरी मदतीचे चित्र अस्पष्ट आहे. /(प्रतिनिधी) 

उभे पीक आडवे.. :हिंगोली कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरातही मोठा पाऊस झाला. त्यात सर्वच पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यातील गहू झोपी गेल्याचे दृश्य. ५0 टक्क्यांपुढे नुकसान नाही
- गतवर्षी झालेल्या गारपिटीत ५0 टक्क्यांच्या पुढे नुकसान अधिक असल्यामुळे फुल नाही फुलांची पाकळी शेतकर्‍यांची हाती पडली. आता गारपीट नसल्यामुळे पावसाने नुकसानी तीव्रता लक्षात घेण्यासाठी सर्व्हेक्षण केले. ५0 टक्क्यांपुढे एकाही हेक्टरवर नुकसान झालेले एकही हेक्टर नाही. 
डोंगरकडा परिसरात नुकसान
- डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरात वरूड, भाटेगाव, हिवरा, जवळा पांचाळ, वडगाव, रेडगाव, वसफळ, जामगव्हाण, सुकळीवीर आदी गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला. त्यात १ मार्च रोजी सकाळी ३ च्या सुमारास झालेल्या पावसाने गहू, हरभरा, ज्वारी हे पिकांचे नुकसान झाले. आंब्याला फटका, संत्रीची नोंद नाही
- सलग पाच वर्षांपासून संकरित आणि परजिल्ह्यातील आंब्यावर रसाची मदार आहे. यावेळीही मोहोर जोरात आला असताना पावसाने तो गळाला. त्यात वसमत आणि हिंगोली वगळता तीन तालुक्यांत नुकसानीची नोंद केली. मात्र हिंगोली तालुक्यात कमी प्रमाणात का होईना असलेली संत्र्याच्या नुकसानीची नोंद नाही. इतर पिकांत डाळिंबाचे १९ हजारांवर नुकसान दाखवले. द्राक्ष, आवळा, चिकू, पेरूचे कॉलम नील असताना संत्र्यांच्या नुकसानीचा कॉलमही नाही आणि नुकसानीचा उल्लेख नाही. त्यामुळे अस्मानीबरोबर सुलतानी संकटही संत्रा उत्पादकांवर ओढवले आहे. 

Web Title: 29 thousand hectare loss of Rabi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.