विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थानतर्फे ३ लाख मोदक, राज्यासह परराज्यातील भाविकांच्या दर्शनासह रांगा

By यमेश शिवाजी वाबळे | Published: September 9, 2022 10:08 PM2022-09-09T22:08:46+5:302022-09-09T22:10:17+5:30

नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीच्या चिंतामणीचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाखो भाविकांनी दर्शन घेतले.

3 lakh modaks by Vighnaharta Chintamani Ganapati Sansthan queues with devotees from the state as well as from out of maharashtra | विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थानतर्फे ३ लाख मोदक, राज्यासह परराज्यातील भाविकांच्या दर्शनासह रांगा

विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थानतर्फे ३ लाख मोदक, राज्यासह परराज्यातील भाविकांच्या दर्शनासह रांगा

Next

हिंगोली : नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीच्या चिंतामणीचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाखो भाविकांनी दर्शन घेतले. तर रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा कायम होत्या. हिंगोली शहरातील गड्डेपीर गल्ली भागात असलेला चिंतामणी नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी अनंत चतुर्दशीला याठिकाणी मोदकोत्सव साजरा होतो.

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे हा उत्सव साधेपणाने साजरा करावा लागला. त्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला होता. यंदा मात्र हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. भाविकांची गर्दी लक्षात घेता संस्थानच्या वतीने तयारी करण्यात आली होती. अनंत चतुर्दशीला चिंतामणीचे दर्शन व्हावे यासाठी काही भाविक रात्रीच हिंगोलीत दाखल झाले होते. रात्री १२ वाजेपासून दर्शनरांगा लागल्या होत्या. दिवसभरात सुमारे दीड लाखांवर भाविकांनी चिंतामणीचे दर्शन घेतले. तर रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा कायम होत्या.

महिनाभरापासून सुरू होती तयारी...
चिंतामणी संस्थानच्या वतीने ३ लाख नवसाचे मोदक तयार करण्यात आले होते. संस्थांचे वतीने मोदक तयार करण्यासाठी कर्मचारी ने भाग घेत होते यासाठी कुठलाही मोबदला मोदक तयार करण्यासाठी दिला गेला नाही. हरिपाठ मोदक तयार करण्यासाठी परिश्रम घेतले. पहाटेपासून भाविक नवसाचे मोदक नेत होते. रात्री उशिरापर्यंत ह्या मोदकाचे वाटप सुरू होते.

Web Title: 3 lakh modaks by Vighnaharta Chintamani Ganapati Sansthan queues with devotees from the state as well as from out of maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ganpatiगणपती